Best News Portal Development Company In India

बोरगाव येथे घरफोडी कडी-कोंडा तोडून १ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास!

बोरगाव येथे घरफोडी कडी-कोंडा तोडून १ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास!
​नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल.
​तुळजापूर प्रतिनिधी :- धाराशिव जिल्ह्यातील बहुतेक एसटी स्टँड वरती चोरट्यांचा धुमाकूळ सुरू होता पण आता त्यांचा मोर्चा खेडेगावातील बंद घरांकडे वळला आहे . तुळजापूर तालुक्यातील बोरगाव येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कमेसह चांदीचे दागिने असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव येथील रहिवासी फिर्यादी आप्पाराव शिवाजी मुळे (वय ६२ वर्षे) यांचे राहते घर दि. १९ मे २०२६ रोजी रात्री बंद होते. दरम्यान, मध्यरात्री १.०० ते सकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील ४०,००० रुपये रोख आणि चांदीचे दागिने असा एकूण १,१५,००० रुपयांचा माल लंपास केला.
हा चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी आप्पाराव मुळे यांनी दि. २० मे २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून (FIR) नळदुर्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून. प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनुचित प्रकार दिसतात पोलिसांशी संपर्क साधावा.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india