Best News Portal Development Company In India

उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलचे 9 विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्ती साठी पात्र!

उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलचे 9 विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्ती साठी पात्र
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
उमरगा येथील आय एस ओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूल मधील पाचवीचे 18 पैकी 9 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत. पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक पद्माकर मोरे धनराज तेलंग प्रवीण शिंदे वर्षाराणी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रशालेतून सर्वप्रथम बिस्मिल्ला मुल्ला 220 महेश्वरी पालम पल्ले 202 श्रद्धा जाधव 202 आलीना औटी 198 साहिल राठोड 178 गोविंद पवार 170 समीक्षा कांबळे 168 श्रवण पाटील 162 भाग्यश्री कांबळे 128 गुण घेऊन पात्र झाले आहेत.गेल्या चार वर्षांत प्रशालेचे 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील प्रवीण शिंदे वर्षाराणी पाटील सोनाली मुसळे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, सुजाता मोरे ,अमर वरवटे, अशोक पतगे, शिक्षणतज्ञ सदानंद शिवदे पाटील मुख्याध्यापक पद्माकर मोरे गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत केंद्रप्रमुख शिला मुदगडे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शिंदे प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे तर आभार वर्षाराणी पाटील यांनी मानले यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india