पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियानाचे उद्घाटन संपन्न!
प्रथम सत्र : वैचारिक अधिष्ठान.
उमरगा/लोहारा प्रतिनिधीआदिनाथ भलेराव.
भाजपा परिवाराच्या वतीने देशभरात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत लातूर ग्रामीण जिल्ह्याचा दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग आज उदगीर येथील शिवम रिसॉर्ट येथे पार पडला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भाजपा नेते प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या दिवशी आयोजित “वैचारिक अधिष्ठान” या प्रथम सत्रात प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीकिशनजी बाहेती होते.
राष्ट्रीयत्वाच्या संस्कारांनी प्रेरित कार्यकर्ते घडविण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून, समाजहित व लोककल्याणासाठी कार्य करण्याची भावना अधिक दृढ करण्याचे काम या माध्यमातून व्हावे, असे मत प्रा. सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. यावेळी माजी राज्य मंत्री तथा भाजपा जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी राज्यसभा खासदार धनंजयजी महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. उषाताई तळेगावकर, माजी खासदार सुधाकरराव शृंगारे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, माजी आमदार बबनराव खंदाडे, भाजपा प्रवक्ते गणेश हाके, जिल्हाध्यक्ष श्रीमती उत्तराताई कलबुर्गे, प्रशिक्षण वर्ग प्रमुख रामचंद्र तिरुके, राहुल केंद्रे, श्री. अमोल अनकले,श्री. अमोल निडवदे, चंद्रचकोर कारखाने, सुनील साळवी, चंद्रकांत हांगे, बसवराज बागबंदे, बसवराज पाटील कौळखेडकर, सौ. उषाताई रोडगे, सौ. प्रतीक्षा गुट्टे यांच्यासह शेकडो प्रशिक्षणार्थी कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
लातूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व मंडळ अध्यक्ष, संयोजक व सहसंयोजक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून प्रशिक्षण शिबिर यशस्वी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र तिरुके यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पंडित सूर्यवंशी यांनी केले.








