Best News Portal Development Company In India

महावितरणच्या वाशी उपकेंद्रावर दरोडा: तब्बल १८ लाखांचे कॉपर कॉईल आणि ऑईल लंपास!

महावितरणच्या वाशी उपकेंद्रावर दरोडा: तब्बल १८ लाखांचे कॉपर कॉईल आणि ऑईल लंपास!
​तुळजापूर प्रतिनिधी :- जिल्हाभरात चोरट्यांचा सुळसुळाट महावितरणच्या वाशी उपकेंद्रामध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल १७,९०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.
​मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी दि. १६ एप्रिल २०२६ ते २७ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी १७:०० वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी वाशी उपकेंद्राचे कुलूप तोडून किंवा सुरक्षा व्यवस्थेला चकवा देऊन आत प्रवेश केला. उपकेंद्रातून चोरट्यांनी खालील मुद्देमाल लंपास केला ​कॉपर कॉईल, १८०० किलो ​ट्रान्सफॉर्मर ऑईल, ३४०० लीटर, किंमत, ₹ १७,९०,००० (सतरा लाख नव्वद हजार रुपये) इत्यादी मुद्देमाल चोरीला गेला.
​हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. पराग दादाराव तुरखडे (वय ४१ वर्षे, रा. ब्राम्हणसभा कॉलनी, परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती; ह.मु. वाशी, जि. धाराशिव) यांनी वाशी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून ​त्यांनी दि. २२ मे २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) वाशी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि ३२४(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
​एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉपर आणि ऑईल वाहून नेण्यासाठी चोरट्यांनी मोठ्या वाहनाचा वापर केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. वाशी पोलीस ठाण्याचे पथक उपकेंद्रातील व परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासत असून, संशयितांची चौकशी सुरू आहे. या धाडसी चोरीमुळे महावितरण वर्तुळात आणि वाशी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तरी सर्वांना सतर्क आणि सजग राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. काही अनुचित प्रकार दिसता पोलिसांशी संपर्क साधावा.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india