पंचशिलाच्या परिपालनासाठी,ध्यानसाधने
सरावासाठी,प्रज्ञेच्या विकासासाठी, संबोधिच्या प्राप्तीसाठी आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
येथे बसून येथे आचरण करून आमची मने प्रबुद्ध बनोत,आमचे विचार धम्म बनोत,आमचे परस्परातील संबंध संघ बनोत.सर्व प्राणी मात्राच्या,
हिता-सुखासाठी काया वाचा आणि मने करून आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो या
भन्ते उरगेंन संघरक्षितांच्या समर्पण गाथेने धम्म शिबिराची सुरवात करण्यात आली.
त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटरच्या वतीने येथील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात आयोजित केलेल्या पाच दिवसीय निवासी धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन छत्तीसगड येथिल जेष्ठ धम्मचारी नागरत्न यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.या वेळी त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटरचे चेअरमन धम्मचारी रत्नपालित,धम्मचारी प्रज्ञाजित, धम्मचारी धम्मभूषण,धम्मचारी विबोध आदींची उपस्थिती होती.
अतिशय मंगलमय वातावरणात या निवासी धम्म शिबिराची सुरुवात करण्यात आली,धम्मचारी विबोध यांनी सु मधुर गावाजात गाथा पठण केले पाहुण्याच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.प्रस्ताविक धम्मचारी रत्नपालित यांनी केले. सूत्रसंचालन धम्मचारी धम्मभूषण यांनी केले.
दररोज पहाटे पासून मैत्रीविकास साधना,व आनापानसती ध्यान साधना प्राणायाम,शिकवले जाते.नैतिक मूल्याची शिकवण दिली जाते.पाच दिवस चालणाऱ्या धम्म शिबिरात नमो तस्स भागवतो अरहतो या विषयावर प्रवचने आणि अभ्यास घेतला जात आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांची धम्म क्रांती अबाधित ठेवण्यासाठी आचरण शील व्यक्ती घडविण्यासाठी,धम्म जागृती करण्यासाठी हे शिबिर होत आहे.दररोज वेगवेगळ्या विषयांवर प्रवचने दिली जातात,नियमित ध्यान,संपर्क सराव, पूजा,त्रिरत्न वंदना,गटचर्चा घेण्यात येते.या सोबतच स्वयंशिस्त लावण्यासाठी हे शिबीर अत्यंत उपयुक्त ठरत आहे.






