अधिवक्ता संघ नांदेड तर्फे न्यायिक अधिकाऱ्यांचा हृदयस्पर्शी निरोप समारंभ संपन्न ; न्यायाधीश आणि विधिज्ञ यांच्यातील सुसंवादावर मान्यवरांचा भर
नांदेड अधिवक्ता संघाने घेतला प्रथमच नाविन्यपूर्ण व कौतुकास्पद कार्यक्रम
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
अधिवक्ता संघ नांदेडच्या वतीने नांदेड येथील बँक्वेट हॉल येथे ता.२३ मे शनिवार रोजी नांदेड न्यायालयात मागील ३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि आता बदलीवर जात असलेल्या न्यायिक अधिकारी (न्यायाधीश) यांचा निरोप समारंभ व सुसंवाद कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यायाधीश आणि विधिज्ञ यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यावर मान्यवरांनी भर दिला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. एस.एन.हाके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.न्यायाधीश टी.एस. सोलंकर हे उपस्थित होते.याप्रसंगी न्यायाधीश डॉ.एस.डी.तावशीकर, न्यायाधीश श्रीमती.आर.एम.शिंदे आणि न्यायाधीश एस.डी.इंदलकर यांचा सत्कारमूर्ती म्हणून गौरव करण्यात आला.याशिवाय न्यायाधीश बोराळकर आणि न्यायाधीश अमृत चव्हाण,मंडळाच्या न्यायाधिश मनीषा राठोड यांनीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली.विचार मंचावर नांदेड जिल्हा अधिवक्ता संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड. यदुपत शामसुंदरराव अर्धापूरकर, सचिव अँड.कपिल पाटील,महिला उपाध्यक्ष अँड.सुजाता बगाटे, उपाध्यक्ष अँड.देलमाडे,अँड. वाकोडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाची प्रस्तावना आणि उद्देश सागतांना अध्यक्ष अँड. यदुपत अर्धापूरकर म्हणाले की, नांदेडमध्ये न्यायाधिशांना काम करण्यासाठी अत्यंत पोषक आणि चांगले वातावरण मिळते ज्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त प्रकरणांचा निकाल (डिस्पोजल) लागतो आणि न्यायाधीश व विधिज्ञ वर्गात सतत संवाद,सुसंवाद आणि चांगले संबंध रहावे या हेतूनेच या स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.ज्येष्ठ विधीज्ञां च्या भावना नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ विधीज्ञ अँड.पी.एन.शिंदे,अँड.बी. आर.भोसले,अँड.सय्यद अरिबुद्दीन, अँड.व्यंकटेश पाटनुरकर,अँड. रहमान सिद्दीकी आणि अँड.संजय वाकोडे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.विशेषतः न्या.तावशीकर यांच्या उत्कृष्ट कार्यशैलीचे सर्वांनी कौतुक केले आणि त्यांनी भविष्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (पि.डि.जे.)आणि उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायाधीश व्हावे अशी सदिच्छा सर्व विधीज्ञांनी यावेळी व्यक्त केली.न्यायाधीशांचे अनुभव आणि मार्गदर्शन निरोप घेणाऱ्या न्यायाधीशांनी नांदेडमधील आपल्या कामाच्या अनुभवाबद्दल गौरवोद्गार काढले ज्यामध्ये न्यायाधीश एस.डी.इंदलकर म्हणाले की,नांदेड मधील विधिज्ञ वर्गाची कार्यतत्परता खूप चांगली असल्यामुळे मी त्यांचे कौतुक करतो. कारण निकाल कोणताही लागो परंतु येथील ज्येष्ठ व कनिष्ठ विधिज्ञ कामात कधीही दिरंगाई करत नाहीत ही विशेष बाब त्यांनी अधोरेखित केली.न्यायाधीश डॉ.एच.डी. तावशीकर म्हणाले की,नांदेड मधील माझा १ वर्षाचा काळ कधी व कसा संपला हे मला कळलेच नाही.येथील विधिज्ञ कायदेशीर बाबींमध्ये न्यायाधीशांच्या काही चुका होत असल्यास त्या स्पष्टपणे सांगण्याची हिंमत ठेवतात याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.कनिष्ठ व ज्येष्ठ विधिज्ञांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले मात्र न्यायाधीशांची संख्या अपुरी असल्यामुळे काही कामे प्रलंबित राहिल्याची खंतही त्यांनी मनोगतात व्यक्त केली.न्यायाधीश टी. शएस. सोलंकर म्हणाले की,नांदेडमध्ये दिवाणी (सिव्हील) आणि फौजदारी (क्रिमीनल) अशा दोन्हीं प्रकारच्या कामांचा सखोल अनुभव मला मिळाला.येथील विधिज्ञ वर्ग कायद्याचा दांडगा अभ्यास करून पूर्ण तयारीने न्यायालयात येतो असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.अध्यक्षीय भाषणात अँड.एस.एन.हाके यांनी स्पष्ट केले की,नांदेडचे विधिज्ञ कायद्याच्या तत्त्वांचे पालन करून कामकाज करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहेत.विधिज्ञांकडून कोणतेही काम चुकीच्या मार्गाने केले जात नाही आणि पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी ते न्यायाधीशांना पूर्ण सहकार्य करतात असे प्रतिपादन त्यांनी केले.या कार्यक्रमाचे सुंदर व सुरेख सूत्रसंचालन सदस्य अँड. मुक्ताई पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव अँड. कपिल पाटील यांनी मानले व हा कार्यक्रम नियोजनबद्धरित्या उत्साहात अधिवक्ता संघ नांदेडने यशस्वी केला ज्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील विधिज्ञ बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






