Best News Portal Development Company In India

गोवंशीय जनावरांची कत्तलीकरीता वाहतुक करणाऱ्या विरुध्द स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवची कारवाई !

गोवंशीय जनावरांची कत्तलीकरीता वाहतुक करणाऱ्या विरुध्द स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवची कारवाई !
तुळजापूर प्रतिनिधी :- स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलिसांची आणखी एक दमदार कामगिरी कत्तली करिता जनावरांची अवैद्य वाहतूक करणाऱ्यांना दणका. पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहिती वरून दिनांक 25.05.2026 रोजी 01.30 वा. सु. स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार सोबत पोलीस स्टाप सह पोलीस स्टेशन धाराशिव ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करत असताना येरमाळा ते धाराशिव वाहनांमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तली साठी वाहतुक केली जात आहे अशी माहिती मिळाले वरून पोलीसांनी सदरील वाहनाच्या चालकास गाडी थांबण्याचा इशारा केला. वाहन चालकाने गाडी रोडच्या बाजूला लावली. सदरील वाहनाचे निरीक्षण केले असता वाहनांमध्ये अत्यंत दाटीवाटीने गोवंशीय जनावरे भरले असल्याचे निदर्शनास आले. गाडीमधील गोवंशीय जनावरे कुठून आणलेली आहेत आणि कशासाठी आणलेली आहेत याबाबत वाहन चालकाकडे चौकशी केली असता वाहन चालकाने सामाधानकारक उत्तर दिले नाही. सदरील वाहन तात्काळ पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे घेण्याची सुचना सदरील वाहन चालकास दिली. वाहन पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे आल्यानंतर दोन पंचांच्या समक्ष सदरील वाहनाची निरीक्षण केले असता वाहनांमध्ये सहा गोवंशीय जनावरे पिकअप वाहनासह एकुण 11,30,000 ₹ किंमतीचे मिळून आले. सदरील गाईंना वाहनांमध्ये अत्यंत दाटीवाटीने भरण्यात आले होते. या गाईंना गाडीमध्ये हालचाल करण्यासाठी पर्याप्त जागा नव्हती. अत्यंत त्रासदायक पध्दतीने त्यांची वाहतुक करण्यात येत होती. त्यावरुन पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे गुन्हा नोंदणी क्रमांक 123/2026 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(क) (घ) (ड), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5 (अ) अन्वये गुन्हा नोदंवला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन धाराशिव ग्रामीण चे पोलीस हवालदार 1250 भांगे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, पोलीस हवालदार दत्तात्रय राठोड , पोलीस हवालदार समाधान वाघमारे, पोलीस हवालदार दयानंद गादेकर, पोलीस नाईक अशोक ढगारे , पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड यांचे पथकांने केली आहे.
नागरिकांनी सतर्क आणि सजग राहून काही संशयास्पद दिसताच पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india