Best News Portal Development Company In India

धाराशिवमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईंचा धडाका;कत्तलीसाठी नेली जाणारी ६ गोवंशीय जनावरे जप्त, ११.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

​धाराशिवमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईंचा धडाका;कत्तलीसाठी नेली जाणारी ६ गोवंशीय जनावरे जप्त, ११.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत!
​तुळजापूर प्रतिनिधी:- धाराशिव जिल्ह्यामध्ये अवैध धंदा करणाऱ्या विरुद्ध कारवाईचा धडाका चालू आहे. प्राप्त माहितीनुसार ईज्जपवार पॅटर्न सक्सेस, कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयीपणे गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ६ गोवंशीय जनावरांसह सुमारे ११,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​गुप्त माहितीवरून पोलिसांनी लावला सापळा
​दिनांक २५ मे २०२६ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार हे आपल्या पथकासह धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान, “येरमाळा ते धाराशिव” या मार्गावरून एका वाहनातून गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली.
​माहिती मिळताच पोलिसांनी सतर्कता दाखवत संशयास्पद वाहनाला थांबण्याचा इशारा केला. चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला लावल्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली.
​पिकअप गाडीत कोंबली होती जनावरे!
​प्राथमिक तपासणीत महिंद्रा पिकअप वाहनामध्ये अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरपणे गोवंशीय जनावरे भरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जनावरे कुठून आणली आणि कुठे नेली जात आहेत, याबाबत चालकाकडे विचारपूस केली असता, त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही.
​त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सदर वाहन धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले. दोन पंचांसमक्ष वाहनाची सखोल तपासणी केली असता, त्यात हालचाल करायलाही जागा नसलेल्या स्थितीत ६ गोवंशीय जनावरे (गायी) आढळून आली. पोलिसांनी ६ जनावरे आणि पिकअप वाहन असा एकूण ११ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​या प्रकरणी जनावरांना अत्यंत त्रासदायक पद्धतीने डांबून वाहतूक केल्याबद्दल धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदणी क्रमांक १२३/२०२६ नुसार खालील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(क), (घ), (ड)​महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (अ)
​सदर गुन्ह्याचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार (बकल नंबर १२५०) भांगे हे करत आहेत.
​’या’ पथकाने केली धडाकेबाज कामगिरी
​सदरची यशस्वी कामगिरी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, पोलीस हवालदार दत्तात्रय राठोड, समाधान वाघमारे, दयानंद गादेकर, पोलीस नाईक अशोक ढगारे आणि पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाचा समावेश होता. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे गोवंशाचे प्राण वाचवण्यात यश आले असून, आणि गुन्हे शाखेचे परिसरात कौतुक होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india