Best News Portal Development Company In India

बहुजन हिताय वस्तीग्रहात पाच दिवसीय निवासी ध्यानसाधना व नित्यमुल्य शिबीर घेण्यात आले.

बहुजन हिताय वस्तीग्रहात पाच दिवसीय निवासी ध्यानसाधना व नित्यमुल्य शिबीर घेण्यात आले.
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
मानवाने स्वतःच्या चित्त शुद्धी सोबत इतरांच्या दुःख निवारणासाठी कार्यरत राहणे हाच सुखाचा मंत्र होय.स्वतःवर मैत्रीचा विकास करून इतरांच्या प्रति तीच मैत्री समान पातळीवर करीत राहिल्यास कोणासही दुःख होणार नाही. मनाचे विकार जाणून ते नाहीसे करण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. स्वतःच्या चित्त शुद्धी सोबत बहुतांचे दुःख निवारण करण्यासाठी झटत राहिल्यास जगात सुखावती निर्माण होण्यास मदत होते.ध्यानाच्या माध्यमातून मनाची शुद्धी होत असल्याचे प्रतिपादन धम्मचारी नागरत्न (छत्तीसगड )यांनी केले.
त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या विद्यमाने शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात पाच दिवशीय निवासी ध्यान साधना व नित्यमूल्य शिबिर घेण्यात आले. शिबिराचा समारोप मंगळवारी करण्यात आला या वेळी धम्मचारी नागरत्न यांनी शिबिरार्थींना संदेश देताना बोलत होते.या वेळी त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटरचे चेअरमन धम्मचारी रत्नपालित यांची उपस्थिती होती.
पाच दिवस चाललेल्या शिबिरात नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स या विषयावर दररोज अभ्यासपुर्ण धम्मदेशना देण्यात आली.नागरत्न यांनी विद्वत्ता प्रचुर वाणीने धम्मपदातील बुद्ध वाणी, बौद्ध साहित्यातील पाली संदर्भातुन शिबीरार्थींच्या मनात जागृतीचा दीप पेटवला.तथागतांना भगवतो,अरहतो, सम्मासम्बुद्धस्स म्हणतात म्हणजे काय ? हे सांगताना तथागतांनी महाप्रज्ञा,महामैत्री,महाकरुणा,महामुदिता महाउपेक्षा अशा अनेक गुणांनी,स्व विकास केला, स्वतःतील दोषांना पुर्णपणे उखडून टाकुन ते परिपूर्ण,परिशुद्ध सम्यक संबुद्ध बनले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की,प्रत्येकाने नियमित धम्मश्रवण, शिलाचरण,समाधी मार्गाचे आचरण करुन बुद्ध गुणांचा विकास केल्याने आपण देखील शाश्वत सुख प्राप्त करु शकतो,कुटुंब,समाज,देश आणि जगाला सुखाकडे नेणारा तथागतांचा हा सनातन मार्ग आहे,या धम्मपथावर कटिबद्ध होऊन मार्गक्रमण केल्यानेच तुम्ही सुखी व्हाल,असा संदेश त्यांनी दिला.
निवासी शिबिरात ध्यान,चंक्रमण,पुजा, गटचर्चा,समुह काम होत असे,
शिलाचरणाचे महत्त्व पटवून देत दररोज रात्री पंचशील या विषयावर धमचारी रत्नपालीत,धम्मचारी विबोध,धम्मचारी धम्मभूषण यांनी मंत्रमुग्ध करणारी प्रवचने दिली,धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी सकाळचे ध्यान, चंक्रमण साधनेचे नेतृत्व केले.शिबिरात एकुण ४० शिबीरार्थ्यांनी सहभाग घेतला होता.शिबिर यशस्वी करण्यासाठी धम्ममित्र उत्तम गायकवाड,धम्ममित्र मारुती कांबळे,धम्ममित्र अजय गायकवाड, धम्ममित्र जी.एल.कांबळे,धम्ममित्र प्रियदर्शी कांबळे,धम्ममित्र प्रीती मनोहर, धम्ममित्र मंदा टिळे,धम्ममित्र संघप्रिया कांबळे,धम्ममित्र राजन जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india