*श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम…*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
येथील श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयाचा विद्यापीठीय परीक्षा मार्च/एप्रिल २०२६ चा बी.एड. प्रथम वर्षाचा निकाल १०० % लागला असुन व द्वितीय वर्षाचा निकाल ९१% लागला. बी.एड. द्वितीय वर्षात महाविद्यालयात गुणानुक्रमे बिराजदार प्रतिक्षा सुभाष या विद्यार्थीने ९०.९०% गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळवला, सास्तुरे नौशिन महमंदसाब या विद्यार्थीनीने ९०.७०% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक मिळवला, कुलकर्णी गार्गी सुरेश या विद्यार्थीनीने ९०.३०% गुण मिळवुन तृतीय क्रमांक मिळविला. प्रथम वर्षात महाविद्यालयात गुणांनुक्रमे बेंबळगे राणी पंढरी या विद्यार्थीनीने ८४.४७% गुण मिळवून प्रथम क्रमांक, भुरे हिंदवी देवराज या विद्यार्थीनीने ८३.६०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, व पाटील प्रिती बालाजी या विद्यार्थीनीने ८३% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
महाविद्यालयाच्या या उत्कृष्ट निकालाबद्दल संस्थेचे सरचिटणीस तथा माजी मंत्री मा. बसवराज पाटील साहेब, अध्यक्ष विनायकराव पाटील साहेब, चिटणीस मा. रामकृष्णपंत खरोसेकर साहेब, उमरगा बँकेचे चेअरमन तथा युवा नेते शरणजी भैय्या बसवराज पाटील साहेब, संस्थेचे सर्व संचालक, श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सरपे, प्राचार्य डॉ. राम सोलंकर आदिनी महाविद्यालयाच्या या उत्कृष्ट निकालाबद्दल अभिनंदन केले आहे.






