Best News Portal Development Company In India

तुळजापुरातील अवैध मटका व्यवसाय त्वरित बंद करा; सामाजिक कार्यकर्ते जयकुमार पांढरे यांचे निवेदन !

तुळजापुरातील अवैध मटका व्यवसाय त्वरित बंद करा; सामाजिक कार्यकर्ते जयकुमार पांढरे यांचे निवेदन !
तुळजापूर प्रतिनिधी:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नगरीत अंदाधुंदी कारभार तुळजापूर शहरातील अवैध मटका व्यवसाय बंद करून चालक व त्यांना संरक्षण देणाऱ्या वर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते जयकुमार पांढरे यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक पोलीस अधीक्षक रितू खोकर आमदार राणा जगजितसिंह पाटील जिल्हाधिकारी किरण यांची पुजारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे. की, तुळजापूर शहरामध्ये जुना बस स्टैंड पाठीमागे श्री तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर खुलेआम अवैध मटका व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सदर ठिकाणी बिनधास्तपणे सुरू असलेला हा अवैध व्यवसाय सामान्य नागरिक, युवक आणि गरीब कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक नुकसान करत आहे.
अनेक कुटुंबे या अवैध मटका व्यवसायामुळे उद्ध्वस्त होत असून नागरिकांमध्ये भीती व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. इतक्या उघडपणे सुरू असलेला हा प्रकार स्थानिक पोलीस प्रशासनाला दिसत नाही का? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. वारंवार तक्रारी व पुरावे समोर येऊनही संबंधितांवर कठोर कारवाई होत नसल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे मनोबल वाढत आहे. तरी आपण या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित ठिकाणी सुरू असलेला अवैध मट्का व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावा.
संबंधित मटका चालक व त्यांना संरक्षण देणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
परिसरात विशेष पोलीस पथक नियुक्त करून नियमित तपासणी करण्यात यावी.
नागरिकांचे आर्थिक व सामाजिक नुकसान थांबवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात.
अन्यथा नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तरी प्रशासन किती गांभीर्याने या घटनेची दखल घेते याकडे संपूर्ण तुळजापूरकरांचे लक्ष लागून राहिलेल आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india