विधान परिषदेच्या धाराशिव – लातूर – बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ
भालेराव.
केंद्रातील व राज्यातील सरकारने विकासासाठी घेतलेले निर्णय, राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य हे निश्चितच प्रेरणादायी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करत आहे, तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या दिशेने अधिक वेगाने पुढे जात
असुन या निवडणुकीच्या माध्यमातून धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न, विकासकामे आणि जनतेच्या अपेक्षा प्रभावीपणे मांडण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री बसवराज पाटील यांनी विश्वास व्यक्त केले.
यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार सुरेश धस, आमदार अभिमन्यू पवार, आमदार मा. श्री. विक्रम काळे, माजी खासदार मा. सुनील गायकवाड, माजी आमदार मा. बब्रुवान खंदाडे, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार दिनकर माने, माजी आमदार गोविंद केंद्रे, मुरूमचे नगराध्यक्ष मा. बापूरावजी पाटील, प्रदेश उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी प्रदेश सचिव श्री. अरविंद पाटील निलंगेकर,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. अफसर शेख, प्रदेश प्रवक्ते श्री. गणेशजी हाके, प्रदेश सचिव श्री. राहुल केंद्रे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल काळे, धाराशिव जिल्हाध्यक्ष मा. दत्तात्रय कुलकर्णी, अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव, धाराशिव माजी जिल्हाध्यक्ष ॲड. नितीन काळे, लातूर माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, उमरगा जनता बँकेचे अध्यक्ष शरणजी पाटील, परीक्षितजी पवार, राहुल केंद्रे, आयुष्मान भारत मिशनचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, तुळजा भवानी कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रकाशजी आष्टे, औसा माजी नगराध्यक्ष शिरीषप्पा उटगे, औसा माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, बसवराजजी धाराशिवे आदी मान्यवर उपस्थित होते.








