Best News Portal Development Company In India

तुळजापूर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेचे ५० हजारांचे मिनीगंठण लंपास!

तुळजापूर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेचे ५० हजारांचे मिनीगंठण लंपास!
​ तुळजापूर प्रतिनिधी:- सोलापूर-नांदेड बसमध्ये चढताना घडली घटना अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद पुढील तपास चालू आहे.
मिळालेले माहिती नुसार​ धार्मिक क्षेत्र असलेल्या तुळजापूर येथील बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्यांचे धाडस पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून येत आहे. सोलापूर ते नांदेड बसमध्ये चढत असताना एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील तब्बल ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनीगंठण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​ फिर्यादी स्वाती लहु माळी (वय ३७ वर्षे, रा. बार्शी, जि. सोलापूर) या दि. १ जून २०२६ रोजी दुपारी १:२५ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर बसस्थानकावर आल्या होत्या. तिथून सोलापूर ते नांदेड या बसमध्ये चढत असताना प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने स्वाती माळी यांच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण (किंमत अंदाजे ५०,००० रु) अत्यंत चाणाक्षपणे ओढून चोरून नेले.
आपल्या गळ्यातील दागिना चोरीला गेल्याचे लक्षात येताच स्वाती माळी यांनी तात्काळ तुळजापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून (FIR) तुळजापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.
​तुळजापूर बसस्थानक आणि परिसरात प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते, त्यामुळे प्रवाशांनी विशेषतः महिलांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या दागिन्यांची व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. सर्व प्रवाशांनी गाडी चढताना आणि उतरताना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india