ज्ञानज्योती फांऊंडेशन व तेरणा चँरीटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अरोग्य शिबिर घेऊन रुग्णांची करण्यात आली सोय.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ, नवी मुंबई व ज्ञानज्योती फाऊंडेशन, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर संपन्न झाले.
यावेळी तालुक्यातील येणेगुर गावातील २२० रुग्णांनी नेरुळ, नवी मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व औषधोपचार, ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक आहेत. त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील. येणेगुर येथील २२० रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.
तेरणा चारिटेबल ट्रस्ट व ज्ञानज्योती फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या येनेगुर येथीलआरोग्य शिबिरास भेट. मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या कडून रुग्णांची तपासणी करण्यात येत होती. बहुसंख्य नागरिकांनी याचा लाभ घेतला. याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख, संदीप जगताप सर, विभाग प्रमुख श्री शहेनशहा बिराजदार, वैद्यकीय शिवसेना कक्ष प्रमुख अमर शिरोळे, ज्ञानज्योती फाउंडेशनच्या संचालिका, सौ शुभांगी जगताप, युवा सैनिक मंगेश सुतार, शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








