Best News Portal Development Company In India

नळदुर्गचे अप्पर तहसिल असून अडचण आणि नसून खोळंबा!

नळदुर्गचे अप्पर तहसिल असून अडचण आणि नसून खोळंबा
– – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी दूर होण्या कामी अप्पर तहसिल कार्यालय सुरुवात करण्यात आले पण असून अडचण आणि नसून खोळंबा म्हणण्याची वेळ येथील नागरीकावर आली आहे .
याबाबत प्राप्त माहिती अशी की तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांनी नळदूर्ग आणि परिसरातील गावखेड्यातील नागरीकांना तहसिलच्या कामाकरिता तुळजापूर येथे यावे लागत होते त्यांचा संपूर्ण दिवस हा कामानिमीत जात होता तालुक्यातील शेवटचे गाव बोळेगाव कुनसावळी येथील नागरीकांना संपूर्ण दिवस हा कामानिमीत जात होता ही बाब आमदार साहेबाच्या लक्षात आली माझ्या मतदार संघातील नागरीकाची शासकीय कामानिमीत बंडाळ होऊ नये त्याना जवळचं अंतर काम करण्याकरिता सोयीचे व्हावे म्हणून अप्पर तहसिल कार्यालय नळदुर्ग येथे चालू करण्यात आले पण येथील आधिकारी तक्रारदार नागरीकांची वेळेत दखल घेवून कामे करित नाहीत . जळकोट येथील शेतकरी महिलाने १६ एप्रिल २०२६ रोजी शेतीचा रस्ता आडविल्या बाबत निवेदन दिले . याबाबत जिल्हाधिकारी साहेब यांनी स्वःता भ्रमणध्वनीवरून तुळजापूरचे तहसिलदार बोळंगे साहेब यांना या प्रकरणी सागितले व हा रस्ता खुला करून दयावा असे आदेशित केले पण हे प्रकरण अप्पर तहसिल कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले संमंधीत आधिकारी यांना वेळो वेळी प्रत्यक्ष जावून सदरील प्रकरणी विनंती केली पण मात्र कोणाही या प्रकरणाकडे लक्ष दिले नाही . सद्या पावसाळा जवळ आला आहे मशागतीचे दिवस आहेत पण तक्रारदार महिलेच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही ती शेती रस्त्या आभावी नागरणे कुळवणे थांबले आहे जर वेळेत हा रस्ता खुला करून नाही दिला तर शेतकरी महीलेचे शेत पडीक पडून कुटूबाबर उपासमारीची वेळ येवू शकते . म्हणुणच अप्पर तहसिल असून अडचण आणि नसून खोळंबा म्हणण्याची वेळ नागरीकांवर आली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india