Best News Portal Development Company In India

नळदूर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्यूत पंप आणि वायर चोराची टोळी सक्रीय!

नळदूर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्यूत पंप आणि वायर चोराची टोळी सक्रीय!
– – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट इटकळ काटगाव आणि परिसरात शेतकऱ्यांचे शेतीतील व तलावावरील पाण्याच्या मोटार चोरीचे प्रमाण वाढले असून या परिसरात चोरट्यानी धुमाकूळ घातला असून शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे .
याबाबत प्राप्त माहिती अशी की जळकोट साठवण तलावावर बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी मोटार बसविलेली आहेत पण गेल्या आठडावभरा पूर्वी तलावारील विदयूत मोटारीचे संपूर्ण वायर कट केले काही शेतकऱ्याचे वायर तोडून तालावाजवळ टाकले काही जणाचे चोरट्यानी घेवून गेले आहे . हीच परिस्थिती इटकळ आणि परिसरात दिसून येत आहे तर काटगाव गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या तलावावरील पण मोटार चोरीला गेल्या संदर्भात शहापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य सुनिल बनसोडे यांना गावकऱ्यांनी भ्रमन ध्वनीवरून माहिती दिल्याचे समजते . अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सध्या उन्हाळा फार कडक असून बऱ्याच शेतकऱ्यांनी ऊसाची लावण केली असून शेवटच्या टप्प्यात पाणी देणे गरजेचे आहे . आणि आश्यातच विदयूतमोटार चोरीचे प्रमाण वाढले असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामाना करावा लागत आहे मोटारीची आणि वायरांच्या किंमती भरामसाठ वाढल्या असून शेतकऱ्याचे आतोनात नुकसान होत आहे . सध्या नळदूर्ग पोलीस ठाण्याचे नुतन पोलीस निरीक्षक म्हणून रविंद्र गायकवाड साहेब हे पदभार स्वीकारला असून या चोरट्याचा बंदोबस्त करतील का ? व नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार घडणाऱ्या विद्यूत मोटार व वायर चोऱ्या थांबतील का ? असा प्रश्न परिसरातील शेतकरी बांधवानी व्यक्त केला आहे. .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india