Best News Portal Development Company In India

श्री तुळजाभवानी मंदिरात ‘शिवराज्य अभिषेक दिन’ साजरा करण्याची मागणी!

श्री तुळजाभवानी मंदिरात ‘शिवराज्य अभिषेक दिन’ साजरा करण्याची मागणी!
तुळजापूर प्रतिनिधी :- सबंध हिंदुस्तानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्री तुळजाभवानी मंदिरात विशेष अभिषेक सोहळा आयोजित करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा मराठा सेवक रवींद्र ज्ञानोबा साळुंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दि. ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन राज्यभर उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या सिंहासनासमोरील परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात यावा, तसेच देवीच्या अभिषेक पूजेसह शिवरायांच्या पुतळ्यालाही अभिषेक करून हा सोहळा धार्मिक व ऐतिहासिक परंपरेला साजेशा पद्धतीने साजरा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या सोहळ्यास श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, विश्वस्त, उपविभागीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध मान्यवर आणि महंत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात यावा, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री तुळजाभवानी माता यांचे ऐतिहासिक नाते लक्षात घेता मंदिर परिसरात शिवराज्याभिषेक दिन अधिकृतरीत्या साजरा करण्यास भाविक व शिवप्रेमींकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन या मागणीची दखल घेणार का, याकडे शिवभक्तांचे लक्ष लागले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india