परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे घेतले धाराशिव/लातूर/बीड स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिक्रत उमेदवार मजी.मंत्री बसवराज पाटिल यांनी केले दर्शन.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
परळी येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील पवित्र श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर, परळी येथे जाऊन भगवान महादेवांचे माजी मंत्री बसवराज पाटिल यांनी दर्शन घेतले. यावेळी मनोभावे पूजा-अर्चना व आरती करून सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि राज्याच्या प्रगतीसाठी माजी मंत्री बसवराज पाटिल यांनी मनोभावे प्रार्थना केली.
यावेळी परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व वैजनाथ मंदिराचे विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे यांनी मंदिरात माजी मंत्री बसवराज पाटिल यांचा यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यातून आध्यात्मिक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली.
यावेळी प्रा. पी. व्ही. मोतीपवळे, नगरसेवक ,योगेश मेनकुदळे, नगरसेवक तथा गटनेते वैजनाथ सोळंके, राजेंद्र सोनी, योगेश गिरवलकर तसेच लातूर जिल्ह्यातील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर, औसा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील मिटकरी, लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, माजी नगराध्यक्ष प्रदीप दिंडेगावे आदी मान्यवर उपस्थित होते.









