Best News Portal Development Company In India

कत्तलीसाठी चालवली होती बैलांची क्रूर वाहतूक; लोहारा पोलिसांची सालेगावात मोठी कारवाई, तिघांवर गुन्हा दाखल!

कत्तलीसाठी चालवली होती बैलांची क्रूर वाहतूक; लोहारा पोलिसांची सालेगावात मोठी कारवाई, तिघांवर गुन्हा दाखल!
​तुळजापूर प्रतिनिधी :- कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची बेकायदेशीर आणि क्रूरपणे वाहतूक मुक्या प्राण्यांना वाहनात कोंबून, त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता अत्यंत निर्दयपणे कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या टोळीचा लोहारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी आयशर टेम्पो चालकासह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर प्राणी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
​मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ जून २०२६ रोजी दुपारी २:१० वाजण्याच्या सुमारास सालेगाव येथील दक्षिण बाजूकडून उत्तर बाजूकडे जाणाऱ्या रोडवर, भिमनगरजवळ लोहारा पोलिसांचे पथक गस्तीवर होते. दरम्यान, पोलिसांना एका संशयास्पद आयशर टेम्पोची (क्रमांक: MH 44 U 3883) माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून सदर वाहन थांबवले आणि पाहणी केली.
​पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवंशीय जातीचे चार बैल अत्यंत क्रूरपणे आणि दाटीवाटीने भरलेले आढळून आले. या निष्पाप प्राण्यांना हालचाल करायलाही जागा नव्हती, तसेच त्यांच्या खाण्या-पिण्याची किंवा पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. प्राथमिक तपासणीत या बैलांची बेकायदेशीर रित्या कत्तलीच्या उद्देशानेच वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.
​याप्रकरणी लोहारा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सरकारतर्फे पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून टेम्पो चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन इसमांविरुद्ध खालील कलमांनुसार गुन्ह्यांची नोंद.
​प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम: कलम ११(१)(डी), (ई), (एच) ​महाराष्ट्र पोलीस कायदा (मपोका): कलम ११९ ​भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ३(५)
​बेकायदेशीर प्राणी वाहतूक आणि गोवंश कत्तलीच्या उद्देशाने होणाऱ्या हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील असणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा लोहारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
तरी सर्व नागरिकांनी सजगआणि सतर्क राहून असा अनुचित प्रकार दिसताच पोलिसांशी संपर्क साधावा.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india