*उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलचे नेत्रदीपक यश*
*विकसित भारत बिल्डकॉन 2025 राष्ट्रीय स्पर्धेत वैष्णवी केदारे जिल्ह्यात प्रथम*
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
येथील आय एस ओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूल मधील इयत्ता आठवीच्या वैष्णवी केदारे,पलक वरवटे,खुशी शिरसले, पूजा मोरे या टीमने सादर केलेल्या एम्पॉवरिंग गर्ल्स या थीमला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्याने धाराशिव जि प च्या उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती उषाताई गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी धाराशिव चे माजी खासदार रवींद्रजी गायकवाड नगराध्यक्ष किरण भैया गायकवाड सौ शिवाई गायकवाड सदानंद शिवदे पाटील प्रदीप मदने प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे नागेश स्वामी सोनाली मुसळे उपस्थित होते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या मार्गदर्शनानुसार अटल इनोवेशन मिशनद्वारे आयोजित विकसित भारत बिल्डकॉन 2025 ची मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होऊन राष्ट्रीय राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशातील विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादाची नोंद घेत गीनीज वर्ल्ड रेकॉर्ड द्वारे या स्पर्धेला सर्वात मोठी नवोन्मेष स्पर्धा म्हणून गौरविण्यात आले. या ऐतिहासिक यशाचा गीनीज पुरस्कार वितरण सोहळा 25 मे 2026 रोजी नवी दिल्ली येथे पार पडला या कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्यातून उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलच्या वैष्णवी केदारे या विद्यार्थिनीने सादर केलेल्या उपक्रमाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. राष्ट्रीय स्तरावर 10 विजेते राज्यस्तरावर 100 विजेते व जिल्हा स्तरावर हजार विजेत्यांना एक कोटी रुपयाचे पारितोषिक वितरण होणार आहे. त्यात वैष्णवी केदारे हिला रोख पारितोषिक,प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्राप्त होणार आहे. जिल्ह्यातून या स्पर्धेत विविध शाळेतून 376 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये वैष्णवी ने प्रथम क्रमांकाचे यश मिळवले आहे या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील नऊ टीम ने सहभाग नोंदवला होता. या यशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक विद्यानंद सुत्रावे अटल तालुका समन्वयक ताजोद्दीन सरवडे यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.अशोक हुंबे व रवींद्र स्वामी यांनी काम पाहिले. वैष्णवीच्या यशाबद्दल आमदार प्रवीण स्वामी धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील धाराशिव जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर शिक्षणाधिकारी माध्यमिक सुधा साळुंके शिक्षण अधिकारी प्राथमिक डाॕ.रविंद्र खंदारे उपशिक्षणाधिकारी दिनकर होळकर , उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे विस्तार अधिकारी भारत देवगुडे उमरगा पंचायत समितीच्या सभापती आकांक्षाताई चौगुले गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत विस्तार अधिकारी शिला मुदगडे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे सुजाता मोरे अशोक पतगे अमर वरवटे शाळेतील सर्व शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.






