Best News Portal Development Company In India

नांदेडच्या भाविकाने तुळजाभवानी चरणी अर्पण केली १ किलो चांदीची मूर्ती!

नांदेडच्या भाविकाने तुळजाभवानी चरणी अर्पण केली १ किलो चांदीची मूर्ती!
​तुळजापूर प्रतिनिधी :-महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी च्या चरणी राजरोसपणे भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देवीच्या चरणी बोललेला नवस पूर्ण करतात. ही परंपरा अनादी कालापासून चालत आलेली आहे. आजही तसेच भक्ती- शक्तीच्या दरबारात दातृत्वाचा संगम पाहायला मिळाला.साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी नांदेड येथील एका निस्सीम भक्ताने १ किलो वजनाची चांदीची आकर्षक मूर्ती अर्पण केली आहे.
​नांदेड येथील रहिवासी सचिन सैनाजी खिल्लारे हे आज आपल्या कुटुंबीयांसह श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. देवीचे भावपूर्ण दर्शन घेतल्यानंतर, त्यांनी आपल्या भावना आणि श्रद्धा व्यक्त करत एक किलो वजनाची चांदीची श्री तुळजाभवानी देवीची देखणी मूर्ती मंदिराला देणगी म्हणून अर्पण केली.
​भाविकाच्या या दातृत्वाची दखल घेत, श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानच्या वतीने सचिन खिल्लारे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
​याप्रसंगी विकास वाणी, मनोज कदम यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खिल्लारे यांच्या या भक्तीभावाची सध्या तुळजापूर परिसरात आणि भाविकांमध्ये मोठी चर्चा आहे.
नांदेडचे भाविक श्री. सचिन सैनाजी खिल्लारे यांनी कुटुंबीयांसह कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन, देवीच्या चरणी १ किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण केली.
जगत जननी श्री तुळजाभवानी आणि तिचे निस्सिम भक्त यांचे एक अतूट नाते आहे. आणि ते असेच पुढे चालू राहणार.”जगदंब”!

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india