Best News Portal Development Company In India

धाराशिव/लातूर/बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या अनुशंघाने महायुती पदाधिकारी यांची बैठक संपन्न!

धाराशिव/लातूर/बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या अनुशंघाने महायुती पदाधिकारी यांची बैठक संपन्न.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

दि.७ रोजी धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सहकाऱ्यांची बैठक पार पडली. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये उपस्थितांशीभारतीय जनता पक्ष, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुती चे अधिक्रत उमेदवार माजी मंत्री बसवराज पाटिल यांनी संवाद साधला व विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाच्या नियोजनाबाबत, संघटनात्मक बांधणी, प्रचाराची दिशा तसेच कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत विचारमंथन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विजयासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास महायुती च्या पदाधिकारी यांनी व्यक्त केला.

यावेळी बैठकीला माजी मंत्री व आमदार राणाजगजित सिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, माजी आमदार सुरजितसिंह ठाकूर, तुळजा भवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण, मुरूमचे नगराध्यक्ष बापूराव (काका) पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण भैय्या पाटील, समरजितसिंह ठाकूर, भाजप प्रदेश सदस्य अँड. अनिल काळे, मराठवाडा संयोजक नितीन काळे, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव, नळदुर्ग नगराध्यक्ष बसवराज धरणे, धाराशिव नगराध्यक्षा सौ. नेहाताई राहुल काकडे, तुळजापूर नगराध्यक्ष विनोद गंगणे, जिल्हापरिषद बांधकाम सभापती सिद्धेश्वर कोरे, पंचायत समिती सभापती सौ. गोकर्णाताई कदम, सौ. अस्मिताताई कांबळे, माजी नगराध्यक्ष मधुकरराव तावडे, विठ्ठल साई सह सा.कारखान्याचे संचालक रामकृष्णपंत खरोसेकर, माणिकराव राठोड, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, सौ. प्रितीताई कदम यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील सर्व मंडळाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका व नगरपंचायत नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india