तुरोरी येथे शिवराज्याभिषेक दिन विविध उपक्रमांनी थाटात साजरा.
तुरोरी/ प्रतिनिधी दमयंती भालेराव.
तालुक्यातील तुरोरी येथे दि.६रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व अगदि उत्साहाने शिवराज्याभिषेक दिन साजरा करतात आला.
यावेळी शिवाजी चौकातील शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक माजी प.स.उपसभापती युवराज जाधव याच्या हस्ते व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मान्वरांनी मनोगतपर भाषणे करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवनगौरवशाली ईतीहासा बद्दल सखोल मांडणी करुण समाज हितासाठी कार्य करण्याचे अवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चरितार्थ पवाडे,देशभक्तीपर गीत गावुन उपस्थितीत मान्यवरांची मने जिंकली.व युवकांनी शिव छत्रपती च्या घोषणा करत परीसर दणाणून गेला होता.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य तुकाराम (भैय्या) जाधव,माजी उपसरपंच पंडित शिंदे,विकास जाधव,वि.का.सेवा सोसायटीचे माजी चेअरमन कुमार पवार, संजय (अण्णा ) जावध,चैतन्य जाधव,अतुल पवार,ज्ञानेश्वर पाटिल, हरी भोसले,







