Best News Portal Development Company In India

विधानपरिषद महायुती चे उमेदवार माजी मंत्री बसवराज पाटील यांनी घेतली माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड सरांची व माजी आ.ज्ञानराज चौगुले यांची घेतली निवासस्थानी सदिच्छा भेट.

विधानपरिषद महायुती चे उमेदवार माजी मंत्री बसवराज पाटील यांनी घेतली माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड सरांची व माजी आ.ज्ञानराज चौगुले यांची घेतली निवासस्थानी सदिच्छा भेट.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
धाराशिव, लातूर, बीड ,विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री तथा लातूर ग्रामीण भाजपाचे जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील यांनी (दि.८)रोजी माजी खासदार प्रा. श्री. रवींद्रजी गायकवाड सर व माजी आ.शिवसेना उपनेते मा.ज्ञानराजजी चौगुले यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट.
यावेळी धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. उषाताई रवींद्र गायकवाड, उमरग्याचे नगराध्यक्ष श्री. किरणजी रविंद्र गायकवाड व त्यांच्या पत्नी यांनी, आत्मीयतेने स्वागत करून विधान परिषद उमेदवारीबद्दल शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रा. रवींद्रजी गायकवाड यांच्याशी राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, सामाजिक प्रश्न, स्थानिक विकासाची दिशा तसेच जनहिताच्या विविध विषयांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा माजी मंत्री बसवराज पाटिल यांनी केले.
यावेळी आष्टा (जहागीर) ग्रामपंचायतीचे उपसरपंच बापुराव मोहनराव गायकवाड, अशोक पतगे, दिलीपजी भालेराव, बळीराम मामा सुरवसे, भास्कर शिंदे, प्रकाश आष्टे, बळीराम मामा सुरवसे, महेश पाटील, संदीप चौगुले आदी उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india