Best News Portal Development Company In India

मुरूम येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात हभप सोमनाथ महाराज बदाले यांचे निरूपण *भगवंताच्या स्मरणासाठी जीवनात सुखा बरोबर दुःखाची ही गरज!

मुरूम येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात हभप सोमनाथ महाराज बदाले यांचे निरूपण
*भगवंताच्या स्मरणासाठी जीवनात सुखा बरोबर दुःखाची ही गरज*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
नामस्मरण म्हणजे भगवंताविषयी भक्तांच्या अंतरंगातला भाव आहे. भगवंताच्या नामस्मरणातुन जीवनात शाश्वत सुख प्राप्त होते. प्रत्येक मनुष्य भगवंताकडे सुख मागत असतो. जीवनात सुख, संपत्ती, ऐश्वर्य आले की मजेत राहत भगवंताचे नामस्मरणच विसरतो. दुःख आले की मात्र आवर्जून भगवंताची आठवण काढत असतो. म्हणून भगवंताचे स्मरण व्हावे यासाठी सुखाबरोबर दुःखाची सुध्दा गरज असते. म्हणूनच कुंती मातेने भगवंताच्या स्मरणासाठी भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे दुःख मगितल्याचे प्रतिपादन हभप सोमनाथ महाराज बदाले सोनपेठकर यांनी केले.
मुरूम येथील माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने रत्नमाला मंगल कार्यालयात संजय मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली व मनीष काबरा यांच्या यजमानतेखाली युवा कीर्तनकार हभप सोमनाथ महाराज सोनपेठकर यांच्या अमृतवाणीने संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्रीमद भागवत कथेतील “तुका म्हणे संतसेवा, हेचि देवा उत्तम” या श्लोकावर निरूपण करताना ते बोलत होते. शनिवारी (दि ६) रोजी सकाळी श्रीमद भागवत कथा ग्रंथाची भक्तिमय वातावरणात शोभायात्रा काढून या कथा सोहळ्याला सुरुवात करण्यात आले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिस्तबद्ध पध्दतीने निघालेल्या या शोभायात्रेत डोक्यावर कळस घेऊन महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दि ६जून ते दि १२जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या संगीतमय कथे दरम्यान रविवारी (दि ७) श्री कपिल अवतार झांकी तर सोमवारी (दि ८) भक्त प्रल्हाद चरित्र कथे प्रसंगी श्री नरसिंह अवतार हुबेहूब साकारण्यात आले. मंगळवारी (दि ९) श्री कृष्ण जन्मोत्सव हुबेहूब साजरा होणार असून आज बुधवारी (दि १९) छप्पन भोग व गोवर्धन कथा होणार आहे. गुरुवारी (दि ११) श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह पार पडणार आहे. शुक्रवारी (दि १२) सुदामा चरित्र कथेने सोहळ्याची समाप्ती होणार असून यावेळी भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार असल्याची माहिती माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष पवन मिनियार यांनी दिली आहे. कथे दरम्यान दररोज रात्री कीर्तन सोहळा पार पडत आहे.
श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ शिवप्रसाद काबरा, डॉ राधाकृष्ण डागा, बालाप्रसाद काबरा, जगदीश मिनियार, विष्णुदास मुंदडा, रमेश मिनियार, श्रीकांत मिनियार, हनुमानदास मुंदडा, सत्यनारायण मुंदडा, अशोक मिनियार, कांताप्रसाद शर्मा, डॉ नितीन डागा, डॉ सागर काबरा, डॉ गिरीश मिनियार, गणेश मिनियार, गोविंद मिनियार, व्यंकटेश मुंदडा, राधे गिलडा, सचिन काबरा, अभिषेक मिनियार, मधुसूदन मिनियार, शिवम शर्मा, श्याम मुंदडा, रमण मुंदडा, किशोर शर्मा, कपिल शर्मा आदी परिश्रम घेत आहेत.
(संगीतमय श्रीमद भागवत कथे दरम्यान माहेश्वरी युवक प्रसंगानुरूप विविध झांकी सादर करत आहेत. शनिवारी अभिषेक मिनियार, प्रीती मिनियार, श्याम मुंदडा, रमण मुंदडा, मधुसूदन मिनियार यांनी गणपती, भक्ती, ग्यानी, वैरागी व नारदाची वेशभूषा करत राजा परीक्षित श्राफ झांकी सादर केली. रविवारी मयंक मिनियार, गणेश मिनियार, राधे गिलडा यांनी कपील अवतार झांकी सादर केली. सोमवारी विहान मिनियार, सागर काबरा, गोपाल मिनियार यांनी भक्त प्रल्हाद, नृसिंह व हिरण्यकश्यप वेशभूषा करत नृसिंह अवतार व भक्त प्रल्हाद झांकी सादर केली. यावेळी “हरे कृष्ण,, हरे कृष्णा,,कृष्णा,, कृष्णा हरे हरे,,, हरे राम,,, हरे रामा,, रामा,,,रामा हरे हरे”, “ओम नमो भगवते वासुदेवाय,,,वासुदेवाय बोलो नंद नंद भायो” जयघोषाने परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाले.
श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात श्री कृष्ण जन्म सोहळा पार पडला. यावेळी महिला भाविकांनी “किती सांगू मी सांगू कुणाला,,,आज आनंदी आनंद झाला”,,,,,, “हाती घोडा पालखी,,,जय कैन्हय्या लाल की” भाजनावर ठेका धरला.)

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india