Best News Portal Development Company In India

थेट दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेणाऱ्या दोघांवर ५ वर्षांची मंदिर प्रवेशबंदी, मंदिर प्रशासन अलर्ट मोड वर!

थेट दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेणाऱ्या दोघांवर ५ वर्षांची मंदिर प्रवेशबंदी, मंदिर प्रशासन अलर्ट मोड वर!
तुळजापूर प्रतिनिधी:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी तुळजापूर प्रशासन हायअलर्ट मोडवर
३ जून रोजी साम टीव्ही या मराठी वृत्तवाहिनीवर श्री तुळजाभवानी मंदिरातील काही पुजाऱ्यांकडून भाविकांची थेट दर्शनाच्या नावाखाली पैसे घेऊन लूट होत असल्याबाबचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने तात्काळ कारवाई करत अभिषेक अशोकराव साळुंखे आणि हर्षल विनोद चव्हाण या दोघांना ५ वर्ष मंदिर प्रवेश बंदी घातली आहे. या कालावधीत संबंधित व्यक्तींना पुढील पाच वर्ष मंदिरामध्ये प्रवेश करता येणार नाही. तसेच या दोघांवर गुन्हा दाखल करण्या संदर्भात तुळजापूर पोलिस स्टेशनला कळविण्यात आले आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस ठाणे करत आहे. भाविकांची कोणीही कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये तसेच भाविकांचे धार्मिक विधी व पूजा अधिकृत पुजाऱ्याकडूनच व्हावी, यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने अनधिकृत पूजारी व्यवसाय करणाऱ्यांवर तसेच भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. हे पथक मंदिर परिसरात नियमित पाहणी करून अनधिकृत बोगस काम करणाऱ्यांवर लक्ष ठेवत आहे.
भाविकांची फसवणूक करणे, दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैसे घेणे अथवा मंदिराच्या अधिकृत व्यवस्थेबाहेर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत काम करणे अशा प्रकारांवर भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येणार असून भाविकांनी दर्शनासाठी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला पैसे देऊ नयेत, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. तुळजाभवानी मातेच्या भाविक भक्तांनी
सुद्धा आपली फसवणूक होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india