चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणातील मुख्य आरोपीला कर्नाटकBorder वरून अटक; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई!
तुळजापूर प्रतिनिधी :- धाराशिवस्थानी गुन्हे शाखेची दणकेबाज कारवाई खुर्द चिंचपूर खुर्द (ता. परंडा) येथील बहुचर्चित खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आणि फरार आरोपीला जेरबंद करण्यात धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. दीपक विक्रम गरड (रा. चिंचपूर खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून, त्याला कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले.
दिनांक १० जून २०२६ रोजी आंबी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९३/२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) आणि ३ (५) अन्वये चिंचपूर खुर्द येथील खुनाच्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर मुख्य आरोपी दीपक गरड हा पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते.
फरार आरोपी दीपक गरड हा कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथे लपून बसल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहिती मिळताच धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशाने एक विशेष पथक तातडीने बसवकल्याण (कर्नाटक) येथे रवाना झाले.
पोलिसांना पाहून आरोपीचा पळण्याचा प्रयत्न, फिल्मी स्टाईलने आवळल्या मुसक्या!
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बसवकल्याण येथे आरोपीचा शोध घेत असताना, आरोपी दीपक गरड याला पोलिसांची चाहूल लागली. पोलिसांना पाहताच त्याने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने आणि धाडसाने त्याचा पाठलाग केला व त्याला जाळ्यात ओढले. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी आंबी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे सर्व जिल्हाभरातून त्यांच्या शौर्याचे कौतुक होत आहे.






