Best News Portal Development Company In India

शशिकांत पंचगल्ले यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी!

शशिकांत पंचगल्ले यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

प्राध्यापक शशिकांत पंचगल्ले यांना अर्थशास्त्र विषयात स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठची पीएच.डी.पदवी जाहीर
दिनांक १० जुन २०२६ रोजी झालेल्या मौखिक परिक्षेनंतर
दिग्रस बु. तालुका कंधार चे भूमिपुत्र तथा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील अर्थशास्त्र विभागात कार्यरत सहाय्यक प्राध्यापक शशिकांत पंडितराव पंचगल्ले यांनी मानव्य विद्या शाखेंतर्गत अर्थशास्त्र विषयात सार्वजनिक वित्त या विषयातील “Evaluation of Provisions of Club Goods and Merit Goods provided by Local Govt.: Case Study of Nanded Waghala Municipal Corporation” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पीएच. डी. शोध प्रबंध स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला सादर केला होता. मौखिक परीक्षेनंतर त्यांना प्रस्तुत विद्यापीठाने पीएच.डी. पदवी जाहीर केली. यावेळी चेअरमन म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्राची प्राध्यापक तथा सामाजिक शास्त्रे संकुलाचे डायरेक्टर डॉक्टर लोणारकर उपस्थित होते. संशोधन मार्गदर्शक डॉ. प्राचार्य विभुते सर सह मार्गदर्शक डॉ. पाते सर, बहिस्थ परीक्षक उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथील प्रा. एम रामलू, प्रा.राम बिऱ्हाडे, प्रा.शालिनी कदम, प्रा. बाबुराव जाधव, प्रा. बोधगिरे, प्रा. चंदन बोरा, प्रा. बाजीराव वडवळे, प्रा. विशाल बेलुरे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी श्री शंकर महाजन, प्रा. डी.डी. भोसले, प्रा.ज्ञानेश्वर पोपुलवाड यांच्या सह सामाजिक शास्त्रीय संकुलातील संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
या पीएच.डी. पदवी मिळवण्यात त्यांच्या पत्नी सौ. मिनल पंचगल्ले यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच त्यांचे वडील गणित विषयाचे गाडे अभ्यासक पंडीत पंचगल्ले व त्यांच्या मातोश्री गोपिका पंचगल्ले,मोठे बंधु सध्या खोपोली येथील महाविद्यालयात कार्यरत डाँ. शरद पंचगल्ले यांचेही मोलाचे सहकार्य लाभले
डाँ.शशिकांत पचगल्ले यांनी पीएच.डी पदवी मिळवल्याबद्धल परिवारातील जेष्ठ वैजनाथराव पंचगल्ले,गंगाधर पंचगल्ले,शिवराज पंचगल्ले,गुरुबस पंचगल्ले,बाबुराव पंचगल्ले,लातुर येथे कर्यरत असलेले सहाय्यक सहसंचालक संजय पंचगल्ले,सोमनाथ निरणे,मन्मथ निरणे,सौ.संगीता निरणे,लता निरणे व संपुर्ण समाज बांधवा कडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india