Best News Portal Development Company In India

श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छता मोहिमेला गती; तीन दिवसांत ५४ जणांवर दंडात्मक कारवाई!

श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छता मोहिमेला गती; तीन दिवसांत ५४ जणांवर दंडात्मक कारवाई!
तुळजापूर प्रतिनिधी:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने मंदिर परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वच्छता मोहीम अंतर्गत तंबाखूजन्य पदार्थ सोबत बाळगणाऱ्या थुंकणाऱ्या तसेच कचरा करणाऱ्यांविरोधातील कारवाई सातत्याने सुरू आहे.
दिनांक १० जून २०२६ रोजी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या २१ जणांवर कारवाई करून १० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर दिनांक ११ जून २०२६ रोजी १६ जणांकडून ८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच दिनांक १२ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आणखी १७ जणांवर कारवाई करून ८ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
या मोहिमेअंतर्गत गेल्या तीन दिवसांत एकूण ५४ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण २७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मंदिर परिसराची स्वच्छता आणि पावित्र्य अबाधित राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच परिसरातील सर्व संबंधितांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे किंवा अस्वच्छता निर्माण करणारे कोणतेही कृत्य टाळावे. स्वच्छ आणि सुंदर मंदिर परिसर घडविण्यासाठी सर्वांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india

पालात राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती समाजातील कुटुंबाची गणना देशाच्या घर गणना व जातनिहाय जनगणना प्रक्रियेत स्वतंत्र रखान्यात नोंद करावी या मागणीकरिता मुशाफिरी यात्रेचे आयोजन : नगरसेवक अँड.अरुण जाधव यांची माहिती!