Best News Portal Development Company In India

शिराढोण पोलिसांची मोठी कारवाई: ‘रॉयल लॉज’वर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका तर दोघे जेरबंद!

शिराढोण पोलिसांची मोठी कारवाई: ‘रॉयल लॉज’वर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका तर दोघे जेरबंद!
​तुळजापूर प्रतिनिधी:-स्वतःच्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दोन महिलांना आश्रय देऊन त्यांच्याकडून अवैद्य देह विक्रीसाठी परावृत्त करणाऱ्या नराधमांना अटक शिराढोण पोलिसांनी केली उत्तम कामगिरी.
नायगाव शिवारातील ‘रॉयल लॉज’वर सुरू असलेल्या अनैतिक देहविक्रीच्या व्यवसायावर शिराढोण पोलिसांनी गुरुवारी (दि. ११ जून) सायंकाळी धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी देहव्यवसायाच्या विळख्यातून दोन पीडित महिलांची सुटका केली असून, लॉज मालक आणि मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कोळेकर यांचे पथक हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्तीवर होते. दरम्यान, नायगाव ते मुरुड रस्त्यावरील ‘रॉयल लॉज’ येथे महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली.
​माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ एक बनावट ग्राहक (पंटर) तयार करून लॉजवर पाठवला. तेथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच, पोलीस पथकाने सायंकाळी ६.१६ वाजेच्या सुमारास लॉजवर अचानक छापा टाकला.
​छाप्यादरम्यान लॉजमध्ये दोन पीडित महिला आढळून आल्या. महिला पोलिसांमार्फत त्यांची विचारपूस केली असता, आरोपींच्या सांगण्यावरून त्यांना व्यावसायिक फायद्यासाठी येथे डांबून ठेवून देहविक्री करण्यास भाग पाडले जात असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून ​रोख रक्कम: ₹५,३००/-
​मोबाईल फोन्स, ​लॉजचे नोंदणी रजिस्टर (डायरी)
​इतर आक्षेपार्ह साहित्य.
​एकूण जप्त मुद्देमाल: ₹१५,४२०/-
​या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले आहे. स्वतःच्या उपजीविकेसाठी महिलांचा छळ करून हा व्यवसाय चालवला जात होता.
१. अक्षय दादासाहेब घोगरे (रा. मुरुड, ता. जि. लातूर) – लॉज मालक
२. अजय अच्युत रसाळ (रा. मुरुड, ता. जि. लातूर) – लॉज मॅनेजर
​या दोन्ही आरोपींविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४१, १४३, १४४(२), ३(५) आणि मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम (PITA) कलम ३, ४, ५, ६ अन्वये गुन्हा (गु.र.नं. १४१/२०२६) नोंदवण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कोळेकर व त्यांच्या पोलीस पथकाने केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अनुचित प्रकार दिसतात पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india

पालात राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती समाजातील कुटुंबाची गणना देशाच्या घर गणना व जातनिहाय जनगणना प्रक्रियेत स्वतंत्र रखान्यात नोंद करावी या मागणीकरिता मुशाफिरी यात्रेचे आयोजन : नगरसेवक अँड.अरुण जाधव यांची माहिती!