जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक नेताजी कवठे यांचा प्रा .सुरेश बिराजदार यांनी केला सत्कार.
उमरगा लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या संचालकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नेताजी निळकंठ कवठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .त्यांच्या या सार्थ निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा सुरेश दाजी बिराजदार यांनी दि.12 रोजी सत्कार करून शुभेच्छा दिल्या .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष दिग्विजय शिंदे ,जिल्हा उपाध्यक्ष भीमा स्वामी , युवानेते रामकृष्ण बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती .
मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नेताजी निळकंठ कवठे यांची उमरगा तालुका प्रतिनिधी म्हणून जिल्हा सहकार बोर्डाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे .मागील अनेक वर्षापासून सहकार बोर्ड व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या माध्यमातून ते सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत .त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश शहापुरे , उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष गायकवाड ,मारुती पाटील यांच्यासह रणजीत गायकवाड , मोहन शिंदे , प्रदीप गावकरी ,शिवराज मदने,आदी सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .





