जळकोट येथे सर्व रोग निदान मोफत तपासणी आरोग्य शिबीर संपन्न
– – – – – – – – – – – – – – – – – –
३८०रुग्नानी घेतला शिबीराचा लाभ
– – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व तेरणा स्पेशालिटी हॉऊसपिटल रिसर्च सेंटर नेरळ याच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर घेण्यात आले .
याबाबत प्राप्त माहिती अशी की तेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील याचे वडील माजी मंत्री मा डॉ . पद्मसिंह पाटील साहेब यांच्या ८६ व्या जन्मदिनाच्या निमीत्ताने या शिबीराचे आयोजन करणात आले होते सदर शिबीराच्या अध्यक्ष स्थानी जळकोट तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष यशवंत कदम होते . कार्यक्रमाच्या सुरवातीस ध्वनवंतरी देवीच्या मुर्तीचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या सर्व रोग निदान शिबीराचे उदघाटन पंचायत समितीचे सदस्य अँड आशिष सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तेरणा हाँऊसपिटलचे डॉ निळे डॉ राठोड याची पूर्ण टिम या शिबीरामध्ये उपस्थित होते सर्व मान्यवरांचे यावेळी स्वागत करण्यात आले . या शिबीरामध्ये जळकोट आणि परिसरातील 3८० नागरीकांनी शिबीराचा लाभ घेवून शिबीरामध्ये सहभाग नोंदविला व तपासणी करून घेतले . दरम्यान काही लाभार्थींना धूरदर आजार आहे कोणाचे ऑपरेशन करायाचे आहे अशा रुग्णना मोफत सुविधा नेरळ येथील हॉऊसपिटल मध्ये करण्याकामी त्याना पत्र देण्यात आले ज्याना किरकोळ आजार आहे अश्यांना यावेळी मोफत औषध दवा गोळ्या देण्यात आले . या शिबीरामध्ये सर्व सामान्य नागरीक महीला आदीनी आपल्या विविध आजारावरील तपासण्या करून घेतले व हे शिबीर जळकोट येथे राबविल्याने आमदार राणाजगजीतसिंह पाटील याचे यावेळी ग्रामस्थाच्या वत्तीने आभार मानण्यात आले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कवटे डॉ. श्रीमती शेख मॅडम विनोद ओव्हाळ संजय अंगुले संतोष वाघमारे नागनाथ किलजे अरुण लोखंडे तमाणणाआप्पा माळगे बाळासाहेब पाटील चंद्रकात स्वामी सर आशा सेविका सह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार मेघराज किलजे यानी मानले.






