Best News Portal Development Company In India

मा. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी घेतले सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन; मंदिर परिसरातील विकासकामांची केली पाहणी!

मा. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी घेतले सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन; मंदिर परिसरातील विकासकामांची केली पाहणी!
​तुळजापूर प्रतिनिधी :-धाराशिव जिल्ह्याचे आदर्श व्यक्तिमत्व आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष मा. श्री. कीर्ती किरण पुजार यांनी आज सहकुटुंब श्री आई तुळजाभवानी देवीजींचे अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेतले. अधिक मासाचे पवित्र औचित्य साधून त्यांनी श्री तुळजाभवानी देवीजींची भावपूर्ण आरती केली, तसेच सपत्नीक श्री देवींची ओटी भरून आशीर्वाद घेतले. ते एवढ्या वरती न थांबता तुळजापूरच्या
​विकासकामांचा आढावा घेतला.
​देवीच्या दर्शनापूर्वी जिल्हाधिकारी पुजार यांनी मंदिर परिसरात सध्या सुरू असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन, दुरुस्ती व संवर्धनाच्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. या कामांचा सविस्तर आढावा घेत त्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही केल्या.
​तुळजापुरात येणाऱ्या देशभरातील आणि विदेशातील भाविक भक्तांसाठी मंदिर प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांची त्यांनी माहिती घेतली. तसेच मंदिरात सुरू असलेल्या इतर विविध विकासकामांची गती आणि सद्यस्थिती जाणून घेत भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
​याप्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सहकुटुंब सहपरिवार आई श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतल्याने भाविकांमध्ये सुद्धा आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण मंदिर परिसरात निर्माण झाले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या पारिवारिक देवदर्शनाने शिक्षण आणि सांस्कृतिक वैभव याचा संगम पाहायला मिळाला. माणूस कितीही सुशिक्षित झाला , कितीही मोठा झाला,तरी त्याची नाळ मातीशी जोडलेली आहे. याचे उत्तम उदाहरण “याची देहा याची डोळा ” आई तुळजाभवानीच्या भाविक भक्तांना आज पहावयास मिळाले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india