Best News Portal Development Company In India

लातूर येथे विधान परिषद निवडणुकीची संवाद बैठक माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ संपन्न.

लातूर येथे विधान परिषद निवडणुकीची संवाद बैठक माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ संपन्न.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर येथे महायुतीची संवाद बैठक पार पडली. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील, माजी मंत्री व आमदार संजयजी बनसोडे व शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रमजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला लातूर जिल्ह्यातील महायुतीचे प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करतांना, निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच महायुती म्हणून एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी आमदार रमेशप्पा कराड, औशाचे आमदार अभिमन्यूजी पवार, भाजप प्रदेश उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सौ. मीनाक्षीताई शिंगडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. अंकुश नाडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर जिल्हाध्यक्ष सौ. प्रणिताताई सूर्यवंशी, प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, प्रदेश सरचिटणीस श्री. मुर्तजा खान, श्री. इब्राहिम सय्यद, अनिल वाडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य सौ. जयश्रीताई तवले, जिल्हा परिषद गटनेते दिलीप मडके, रिपाई नेते मिलिंद महालिंगे, वाहिद सय्यद, सभापती सूरज बाबासाहेब पाटील, बबन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india