Best News Portal Development Company In India

गायक मोहम्मद अयाज भारत भूषण पुरस्काराने सन्मानित . उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

गायक मोहम्मद अयाज भारत भूषण पुरस्काराने सन्मानित .
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
नुकतेच सोलापूर सूरमणी व महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज यांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला . सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा मुंबई येथील मेयर सभागृहात आयोजित पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला . माणसाच्या अंगी प्रबळ इच्छा शक्ती जर असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य रहात नाही . मोहम्मद अयाज यांच्पा बाबतीत देखील असच काहीस आहे . मंद्रुप पासुन ते मलेशिया , सिंगापूर, दुबई आफ्रिका, सौदी अरेबिया सारख्या देशात जाऊन आपली कला सादर करून सोलापूरच नांव सांस्कृतिक क्षेत्रात लौकिक केले. सिध्दरामेश्वर भजन , आई तुळजाईचा गोंधळ , स्वामी समर्थ महीमा , देश भक्ती,छत्रपती शिवाजीमहाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर, अशा देवी देवता व महापुरुषांवर आधारित अनेक ध्वनिचित्रफीतीतून मोहम्मद अयाज यांनी आपली सेवा बजावलेली आहे .आपल्या सुरेल आवाजाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जपणारे अयाज हे एकलव्य गायक असुन त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे . शेतकरी कलावंताचा भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मोहम्मद अयाज यांनी हा पुरस्कार माझा नसून माझ्यावर प्रेम दाखवणाऱ्या रसिक माय बाबांचा आहे आणी म्हणून हा पुरस्कार सोलापूरकरांना समर्पित करतो अशी भावना अयाज यांनी व्यक्त केली.
फोटोत- जेष्ठ अभिनेते अली खान , अविनाश जी सिएमङी हुमन राईट्स, संजीवकुमार , राजेश श्रीवास्तव, पुरस्कार प्राप्ती मोहम्मद अयाज इ.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india