Best News Portal Development Company In India

कारने मोटरसायकलला पाठीमागून उडवले; नळदुर्ग येथील एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी!

कारने मोटरसायकलला पाठीमागून उडवले; नळदुर्ग येथील एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी!
तुळजापूर प्रतिनिधी:- आपल्या ताब्यातील कार निष्काळजीपणे चालवून अपघात केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.​ बसवंतवाडी शिवारातील घटना उमरग्याच्या कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
तांबडा मारुती रस्ता किंवा हायवेवरील वेगवान प्रवासादरम्यान निष्काळजीपणा किती महाग पडू शकतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग ६५२ (NH 652) वर बसवंतवाडी शिवारात कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नळदुर्ग येथील साठेनगर भागातील रहिवासी फिर्यादी शिवशंकर बाबुराव देडे (वय ३१ वर्षे) आणि भिमनगर येथील रहिवासी किशोर कोंडीबा बनसोडे (वय ४२ वर्षे) हे दोघे दि. २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोटरसायकल (क्र. MH 25 BH 5937) वरून जात होते.
​ते एनएच ६५२ रोडने बसवंतवाडीच्या थोड्या अलीकडे आले असता, पाठीमागून येणाऱ्या कार (क्र. MH 25 Z 3000) च्या चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. कार चालक अजिम करीम शेख (रा. उमरगा, ता. उमरगा, जि. धाराशिव) याने आपल्या ताब्यातील कार अत्यंत हायगईने, अविचाराने आणि निष्काळजीपणे चालवून या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली.
​उपचारादरम्यान मृत्यू, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
या भीषण अपघातात किशोर कोंडीबा बनसोडे हे गंभीररी्या जखमी झाले होते, दुर्दैवाने या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तर शिवशंकर देडे हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
​या घटनेप्रकरणी जखमी शिवशंकर देडे यांनी दि. १३ जून २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल (FIR) दिला. या फिर्यादीवरून कार चालक आरोपी अजिम करीम शेख याच्याविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), १२५(ए)(बी), २८१ सह मोटार वाहन कायदा (MVA) कलम १८४, १३४(अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत. वाहनधारकांनी बेसिस्तपणे वाहन चालवू नये . कारण आपल्यामुळे कोणाचातरी जीव जाईल हे लक्षात ठेवावे. सतर्क आणि सजग राहून प्रवास करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india