राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाच्या पुढाकाराने डोंबिवलीत भव्य आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
डोंबिवली, दि. 14 जून 2026 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) उद्योग विभाग आणि माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पश्चिम येथील नेमाडे गल्लीतील पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पक्षप्रमुख आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या “पक्ष वाढवा आणि समाजाशी नाळ जोडा” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीत उतरवत उद्योग विभागाने हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविला.
शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी, रक्तदाब तपासणी तसेच विविध आरोग्यविषयक चाचण्या करण्यात आल्या. माधवबागच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकातील डॉ. संध्या शृंगारपुरे, दीपा तारपे आणि डॉ. निकिता भोईर यांनी नागरिकांची तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
या उपक्रमाला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत कदम, अभिजीत आपटे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष विजया भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच गोवर्धन भोईर, शशिकांत म्हात्रे, शरद भोईर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा आणि कल्याण- डोंबिवली शहरचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये उद्योग विभागाचे मुंबई विभाग अध्यक्ष अश्विन हेमंतकुमार केळकर, मुंबई विभाग सचिव प्रा. दीपक संभाजी जाधव, मध्य मुंबई अध्यक्ष संदीप उबाळे, ठाणे शहर अध्यक्ष शाम नाना चौगले, ठाणे ग्रामीण अध्यक्ष ज्ञानेश्वर मराठे, ठाणे शहर सचिव सचिन फुले, कल्याण-डोंबिवली अध्यक्ष वेंकटेश नायडू आणि कार्यालय प्रमुख रवींद्र शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी बोलताना अश्विन केळकर आणि प्रा. दीपक जाधव यांनी सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग हा केवळ राजकीय संघटनापुरता मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेसाठी सातत्याने कार्यरत राहणार आहे. आगामी काळात आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक जनजागृती यांसाठी विविध उपक्रम राबवून पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा निर्धार आहे.”
समाजहिताच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाविषयी सकारात्मक भावना निर्माण झाली असून, भविष्यात अशा अनेक लोकहितकारी उपक्रमांची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.









