Best News Portal Development Company In India

परळी भागातून बसवराज पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करू : धनंजय मुंडे!

परळी भागातून बसवराज पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करू : धनंजय मुंडे

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

नाथरा येथे सदिच्छा भेट; विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग.

धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री बसवराज पाटील यांनी (दि १५ ) रोजी रविवारी परळी तालुक्यातील नाथरा येथे राज्याचे माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी झालेल्या संवाद बैठकीत परळी भागातून माजी मंत्री बसवराज पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
यावेळी आगामी विधान परिषद निवडणुकीसंदर्भात विविध राजकीय व सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्व घटकांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांशी संपर्क वाढवून महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी प्रभावी नियोजनावरही चर्चा झाली.
यावेळी बाजीराव धर्माधिकारी, दीपक मुंडे, अल्ताफ खान पठाण, फारुख सय्यद, नितीन रोडे, सचिन सारडा, इस्माईल शेख, राजा खान पठाण, महादेव रोडे, विनोद जगतकर सर, डॉ. संतोष मुंडे, प्रणव परळीकर, जयपाल लाहोटी, रणजीत देशमुख, विठ्ठलराव बदोले, मदन पाटील, संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे, ॲड. लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह परळी नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना व एमआयएमचे नगरसेवक उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india