उमरगा आगार येथे एस.टी. महामंडळ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सरकारला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
एस.टी.कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी घोषित करा, वार्षिक वेतनवाढ 3% करा,2018 पासून महागाई भत्ता थकबाकी,नवीन बस बांधणी,कॅशलेस मेडिक्लेम सुविधा, कंत्राटी भरती बंद करा या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन
:महाराष्ट्र राज्यातील एस. टी. कर्मचारी शासनात विलीन करून शासकीय कर्मचारी जाहीर करून त्यांच्याप्रमाणे वेतन द्या या प्रमुख मागणीसह,सन 2016-20 मधील वेतनवाढीतील दर पुन्हा 3% करा, 2018 पासूनची महागाई भत्याची थकबाकी तात्काळ अदा करा, एस. टी.साठी स्वातंत्र्य बजेट तरतूद करा, कामगार विरोधी कायदे रद्द करा,कंत्राटी कामगार भरती रद्द करा या मागण्यासाठी उमरगा आगाराच्या मुख्य द्वारावर कामगारांकडून घंटानाद व महाआरती आंदोलन करण्यात आले.
शासन वेळोवेळी आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहे.असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. दि. 15 जून रोजी आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक आगारासमोर घंटानाद व महाआरती आंदोलन करण्यात आले आहे. जर शासनाला जाग आली नाही तर 29 जुनपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कर्मचारी यांनी सरकारला दिला आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक उमरगा,उमरगा- लोहारा आमदार मा.प्रवीणजी स्वामी,आगारप्रमुख मा.प्रसाद कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय कुंभार,आगार सचिव महादेव घोगरे,कार्याध्यक्ष नूरसे, आगार उपाध्यक्ष शरद पवार,अमोल जाधव,प्रसिद्धी प्रमुख कुलकर्णी काका, कालिदास जाधव,व आगारातील यांत्रिक कर्मचारी, चालक,वाहक व महिला कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.






