Best News Portal Development Company In India

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप!

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
————————————————-
नळदुर्ग (एस. के.गायकवाड) :
हॅलो मेडिकल फाउंडेशन, अणदूर व स्विसएड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा झेप किशोरी विकास प्रकल्पा अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी, सराटी सह तुळजापूर व लोहारा तालुक्यातील काही गावांमध्ये गरजू किशोरवयीन मुलींना शालेय साहित्य( बॅग ), सायकल,शिलाई मशीन व शेळ्याचे वाटप करण्यात आले.
. या बाबत सविस्तर वृत्त असे की हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदूर व स्विसएड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रावीविण्यात येणारा झेप किशोरी विकास प्रकल्प जून २०२५ पासून तुळजापूर व लोहारा तालुक्यातील ३० गावांमध्ये कार्यरत आहे. १३ ते १७ वयोगटातील मुलींच्या लिंगभाव दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडवून आणणे, निर्णयक्षमता वाढवणे, जीवन कौशल्ये विकसित करणे तसेच बालविवाह रोखण्यासाठी मुलींना सक्षम बनवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी पालक, युवक व शासकीय यंत्रणांचा सहभाग वाढवून जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचे काम प्रकल्पामार्फत केले जात आहे.
प्रकल्पांतर्गत गावपातळीवरील सखींच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून गरजू व असुरक्षित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी उत्पन्नवाढीची साधने उपलब्ध करून दिली या प्रकल्पांतर्गत लोहारा आणि तुळजापूर तालुक्यातील ३०
गावांमध्ये शेळ्या, शिलाई मशीन, सायकल व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
तुळजापूर आणि लोहारा तालुक्यातील ९५ मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, १९ मुलींना शेळीपालनासाठी मदत करण्यात आली, १३ मुलींना शिलाई मशीन वाटप करण्यात आली, 8 मुलींना सायकल वाटप करण्यात आली या मदतीमुळे मुलींचे शिक्षण सुरू राहण्यास व त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमासाठी स्विसएड संस्थेच्या स्नेहा गिरिधारी मॅडम, प्रकल्प अधिकारी जितेंद्र सावकर, हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी अहंकारी, प्रकल्प संचालक डॉ. क्रांती रायमाने, प्रकल्प समन्वयक नागिनी सुरवसे, किशोरी सहाय्य समितीचे सदस्य दिनकर गाढवे व जावेद शेख, प्रकल्प अकाउंटंट मुन्नाबी इनामदार, डाटा कलेक्टर मिराज नदाफ तसेच पर्यवेक्षिका रत्नमाला खरोसे, सुमती कानडे, शीला भोजने, पल्लवी गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india