Best News Portal Development Company In India

परंड्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; नशिल्या गोळ्यांची विक्री करणारा आरोपी गजाआड, ५७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त!

परंड्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; नशिल्या गोळ्यांची विक्री करणारा आरोपी गजाआड, ५७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त!
​तुळजापूर प्रतिनिधी :- स्थानिक अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला मोठे यश. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF), कृती छत्रपती संभाजीनगर विभागाने परंडा शहरात एक मोठी कारवाई केली आहे. अवैध रित्या नशिल्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका इसमाला रंगेहात पकडून त्याच्याकडून ५७ हजार २०० रुपये किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५/०६/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला एका गुप्त बातमीदाराकडून परंडा शहरात नशिल्या गोळ्यांची अवैध विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने दोन पंच आणि अन्न व औषध प्रशासन निरीक्षकांना सोबत घेऊन परंडा शहरातील शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे सापळा रचला.
​संध्याकाळी १७.०० वाजताच्या सुमारास संशयित इसम नामे शाहीद सादीक शेख (वय ३९ वर्षे, रा. परंडा, जि. धाराशीव) याला ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय विकल्या जाणाऱ्या खालील नशिल्या गोळ्या आणि मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.
​१) Niteor-10 (Nitrazepam घटक असलेल्या): एकूण १५ गोळ्या (किंमत रु. ६०००/-)
२) Nizascen-10 (Nitrazepam घटक असलेल्या): एकूण १० गोळ्या (किंमत रु. ४०००/-)
३) Anzilum 0.5 (Alprazolam घटक असलेल्या): एकूण ९३ गोळ्या (किंमत रु. ३७,२००/-)
४) विवो कंपनीचा मोबाईल फोन: (किंमत रु. १०,०००/- जो नशिल्या गोळ्यांच्या विक्रीसाठी वापरला जात होता)
​असा एकूण ५७,२०० रुपये किमतीचा अवैध अंमली पदार्थ व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हा सर्व साठा अन्न व औषध निरीक्षक यांच्यासमक्ष पोलीस निरीक्षक गीता बागवडे (ANTF) यांनी जप्त केला. यानंतर आरोपीला जप्त मुद्देमालासह परंडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. सफौ/ वाहेद मुल्ला यांच्या फिर्यादीवरून आरोपी शाहीद सादीक शेख याच्याविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुरन-३९०/२०२६, कलम 8(C), 22(A) NDPS Act सहकलम १८(क) औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:
सदर धडक कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस महानिरीक्षक श्रीमती ज्योतीप्रिया सिंह मॅडम, पोलीस अधीक्षक श्री. अजीत टिके साहेब, आणि डि.वाय.एस.पी. श्री. साईनाथ ठोबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
​या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, पोलीस उप-निरीक्षक प्रदीप ठाकूर, मपोउपनि-वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, हवालदार सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, हरीशचंद्र मुंढे आणि ज्योती कीर्तीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कारवाईने अमली पदार्थ विरोधी अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबेदनानले आहे. नागरिकांनी सतर्क आणि सजग राहून काही संशयीत हालचाली दिसताच पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india