Best News Portal Development Company In India

अवैध जनावरे कत्तलीसाठी बांधुन ठेवणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

अवैध जनावरे कत्तलीसाठी बांधुन ठेवणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !
तुळजापूर प्रतिनिधी:- धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत मुक्या डांबून ठेवलेल्या  कत्लीसाठीच्या जनावरांना मोकळा श्वास घेण्याची संधी दिली. दि.१7.०६/२०२६ रोजी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार सो यांचे आदेशाने मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे, पाहिजे फरारी आरोपीची माहिती काढुन कारवाई करिता स्थागुशाचे पथक रवाना होवुन पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनिय बातमी मिळाली की भुम येथे हाडळ परिसरात प्रकाश चौधरी यांचे शेतात मोकळ्या जागेत कत्तल करण्यासाठी गोवंशीय जातीचे मोठे जनावरे/ वासरे बांधलेली आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने बातमीच्या ठिकाणी जावून 17.00 वा. सु. छापा मारला असता नमुद ठिकाणी मोकळ्या जागेत चारा पाण्याची कसलीही सोय न करता आखुड दोरीने निर्दयपणे वेगवेगळ्या झाडांना, लाकडांना बांधलेली एकुण 9 गोवंशीय जातीचे लहान मोठे जनावरे/वासरे मिळून आली. सदर जनावरांबाबत व त्यांचे मालका बाबत आजुबाजूचे लोंकाकडे विचारपुस केली. त्यावर त्यांनी सांगितले की, मुस्तफा कुरेशी, वय 38 वर्षे, रा. भुम ता. भुम जि. धाराशिव यांचे मालकीचे असुन त्याने जनावरे/ वासरे ही कत्तलीसाठी बांधून ठेवलेली आहेत असे सांगितले. त्यावर पथकाने नमुद गोवंशीय जातीच्या 5 जर्शी गाय, 2 कालवड, 1 गिरगाय, 1 खिल्लार असे एकुण 1,20,000₹ किंमतीचे जनावरांना पोलीस ठाणे भुम येथे हजर केले. यावरुन नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे भुम येथे गुन्हा नोंदणी क्रमांक 367/2026 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1) (एफ) 11(1)(एच) अन्वये गुन्हा नोदंवला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्रीमती. रितु खोखर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. अमोल मोरे, पोह -समाधान वाघमारे, बळीराम शिंदे, मपोह- शोभा बांगर, पोलीस नाईक- अशोक ढगारे, चापोअं-दहीहांडे, शेरखाने यांचे पथकाने केली आहे.
सदरील कारवाईने परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे तसेच अशा काही संशयास्पद घटना दिसतात पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india