Best News Portal Development Company In India

कृतज्ञता सोहळ्यात शिंदे परिवाराकडून विद्यार्थ्यांना भेटवस्तूचे वाटप…

कृतज्ञता सोहळ्यात शिंदे परिवाराकडून विद्यार्थ्यांना भेटवस्तूचे वाटप…
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

डॉ. शिवाजी शिंदे यांच्या सेवानिवृत्ती सोहळा नुकताच पार पडला. या पार्श्वभूमीवर शिंदे परिवाराकडून मंगळवारी (दि. १६) रोजी वीरशैव संत कक्कय्या सभागृहात कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मनोहर शिंदे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, सेवानिवृत्त विभागीय व्यवस्थापक डॉ. शिवाजीराव शिंदे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राम कांबळे, सेवानिवृत्त प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, व्ही. व्ही. ए. फाउंडेशनच्या संचालिका रूपालीताई शिंदे, विकास कटकदौंड, वसंत शिंदे, महावीर नारायणकर, धनराज शिंदे, परमेश्वर काजळे आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, राम कांबळे, विकास कटकदौंड, वसंत शिंदे, तृप्ती कटके आदींनी मनोगत व्यक्त केले. सचिन शिंदे, ज्योतिराम शिंदे, धनराज शिंदे, रेवण कटके, राजेंद्र कटके, अमोल कटके, वैभव कटके, गोविंद कटके, सुरज शिंदे, मनोज शिंदे, रोहन शिंदे, ​​ऐश्वर्या शिंदे, ​भक्ती कटके, ​तृप्ती कटके आदींचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन ज्योतीराम शिंदे तर आभार तात्याराव शिंदे यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india