पत्रकार प्रेमनाथ उर्फ प्रवीण राठोड हे “राष्ट्रीय कार्य दर्पण” पुरस्काराने सन्मानित : मित्र परिवारातून होत आहे अभिनंदनचा वर्षाव
—————————————————-
नळदुर्ग (एस.के.गायकवाड): तुळजापूर तालुक्यातील येडोळा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बालाघाट पर्वत रांगेवर बसलेल्या छोट्याशा जखमी तांडा येथिल पत्रकार संपादक प्रेमनाथ उर्फ प्रवीण राठोड यांना नुकतच राष्ट्रीय कार्य दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रवीण राठोड हे पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय असून सातत्याने समाज हितासाठी धडपडणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे गोरगरिबावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचा ते प्रयत्न करतात. एक सामाजिक जाणिवेचा कार्यकर्ता पत्रकार ते युट्युब चॅनेल चे संपादक असा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आहे.त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून कार्य दर्पण युट्युब चॅनेल व महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था नवीन पनवेल नवी मुंबईच्या वतीने दिला जाणारा समाजसेवेतील राष्ट्रीय कार्य दर्पण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले असून सन्मान चिन्ह व सन्मान पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.त्यांना देण्यात आलेल्या सन्मान पत्रात म्हंटले आहे की आपण आपल्या कार्यक्षेत्रात पत्रकारितेच्या माध्यमातून करत असलेले समाजसेवेचे कार्य हे अतुलनीय व प्रेरणादायी आहे.
. त्यांना मिळालेल्या सदर पुरस्काराबद्दल धाराशिव जिल्ह्यातील मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.






