Best News Portal Development Company In India

आंबेडकरी चळवळी पुढे पोलीस प्रशासन हातबल अखेर तुगाव प्रकरणातील तीन आरोपी अटक एकाआरोपीला लवकरच अटक होणार : उपोषण आंदोलनाचा इफेक्ट!

आंबेडकरी चळवळी पुढे पोलीस प्रशासन हातबल अखेर तुगाव प्रकरणातील तीन आरोपी अटक एकाआरोपीला लवकरच अटक होणार : उपोषण आंदोलनाचा इफेक्ट!
——————————————————
जळकोट (अरुण लोखंडे):
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपोषण आंदोलन सुरू करता क्षणी पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि उमरगा तालुक्यातील तुगाव येथील आंबेडकरी चळवळीतील तरुणाला जातीय द्वेश भावनेतून बेदम मारहाण करणार्‍या चार पैकी तीन गाव गुंड आरोपींना मुरूम पोलिसांनी अटक केली आणि एका आरोपीला लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तुगाव तालुका उमरगा येथील तेथील जातीयवादी गाव गुंड रोहित दीपक जोमदे पंकज शंकर जोमदे , महेश गहिनीनाथ जोमदे व चांद अमर फकीर यांनी तुगाव येथील आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते भालचंद्र कांबळे यांचे अपहरण करून शेतात नेऊन द्राक्ष बागेच्या लोखंडी पोलास बांधून लाथा बुक्कीने व चंमड्याच्या कमरपट्ट्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.सदर निंदनीय प्रकार हा मानवतेला काळीमा फासणारा आहे.या निंदनीय घटना प्रकरणातील एका आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली होती.बाकी तीन आरोपी गेल्या एक महिन्यापासून फरार होते. शेवटी आंबेडकरी चळवळतील कार्यकर्त्यांनी अन्यायग्रस्त कुटुंबाला सोबत घेऊन उमरगा येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला त्यामुळे हतबल झालेल्या पोलिसांना तब्बल एक महिन्यांनी त्यातील फरार तीन आरोपी पैकी दोन आरोपींना अटक करावे लागले.असे या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात पोलीसाना यश आले असे म्हणण्यापेक्षा आंबेडकरी चळवळीने अटक करण्यास भाग पाडले. व एक आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून ठोस आश्वासन देण्यात आले. व त्या चारही आरपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला त्यामुळे उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. यावेळी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी यानी उपोषणकर्त्याची भेट घेऊन मी आपल्या समवेत आहे असे ते म्हणाले .
. या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषद धाराशिव चे माजी समाज कल्याण सभापती हरीश डावरे, रिपइं (आठवले) चे राज्य कार्यकारणी सदस्य एस.के.चेले आरपीआय उमरगा तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, सामाजीक कार्यकर्ते धिरज बेळंबकर उमरगा शहर अध्यक्ष संजय उर्फ सिंघम कांबळे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे,वंचित बहुजन आघाडीचे राम गायकवाड शाहूराज भोसले सदाशिव कांबळे सह तुगाव आणि उमरगा तालुक्यातीलआंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. २० जुन पर्यत महेश जामदे या आरोपीस नाही पकडल्यास उमरगा येथील पोलीस उपविभागीय आधिकारी यांच्या कार्यालया समोर हलगी निनाद अंदोलन करण्याचा इशारा अंदोलन कर्त्यानी दिला आहे .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india