एस.के.गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
—————————————————-
आंबेडकरवादी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते, पत्रकार, बौद्धचार्य आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे जिल्हा पातळीवर काम करणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले साहेब यांचे कट्टर समर्थक माझे मित्र एस. के. गायकवाड यांचा आज वाढ दिवस आहे. M.sc.पर्यंत चे शिक्षण झालेला एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात त्यांना लोक ओळखतात अतिशय नम्र, सामाजिक कार्याला पूर्णवेळ देऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणजे एस. के. गायकवाड सिद्राम केशव गायकवाड असे पूर्ण नाव आहे ते वागदरी ता. तुळजापूर या छोट्या गावातील पण अत्यंत मोठे नाव आज झाले आहे. पत्रकारिता हा त्यांचा मूळ पिंड आहे. आपल्या परिसरातील बातम्या नियमित देऊन अनेक प्रश्न जनतेसमोर मांडले आहेत. नळदुर्ग शहर आणि परिसरातील अनेक गरजू लोक त्यांच्याकडे येतात आणि ते त्यांचे काम करतात अशा या सामाजिक चळवळ जिवंत ठेवणाऱ्या कार्यकर्त्यास वाढ दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
मारुती बनसोडे
संस्थापक सचिव
परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग ता. तुळजापूर
9604166899






