Best News Portal Development Company In India

कुलस्वामिनीच्या माहे जुलै २०२६ मधील सिंहासन पूजेच्या ऑनलाईन नोंदणीस प्रारंभ!

कुलस्वामिनीच्या माहे जुलै २०२६ मधील सिंहासन पूजेच्या ऑनलाईन नोंदणीस प्रारंभ!
तुळजापूर प्रतिनिधी:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी   श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा तसेच देशातील विविध राज्यांतून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत असतात. अनेकांची कुलदेवता असलेल्या श्री तुळजाभवानी देवींच्या दरबारात कुलाचार, कुलधर्म व धार्मिक विधी पार पाडण्यासाठी भाविकांची विशेष गर्दी होत असते. श्री तुळजाभवानी देवींची सिंहासन पूजा ही अत्यंत महत्त्वाची व श्रद्धेची पूजा मानली जाते.
भाविकांच्या सोयीसाठी सिंहासन पूजेची नोंदणी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या https://online.shrituljabhavani.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहे जुलै २०२६ मधील सिंहासन पूजेच्या नोंदणीसाठी खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
*सिंहासन पूजा नोंदणी वेळापत्रक*
१) सिंहासन पूजा नोंदणी
दिनांक १९ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून
दिनांक २४ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत
२) प्रथम ऑनलाईन सोडत व पेमेंटसाठी SMS पाठविणे
दिनांक २७ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता
३) प्रथम सोडतीतील भाविकांनी ऑनलाईन पेमेंट करणे
दिनांक २७ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून
दिनांक २८ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत
४) सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास द्वितीय ऑनलाईन सोडत व पेमेंटसाठी SMS पाठविणे
दिनांक २८ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता
५) द्वितीय सोडतीतील भाविकांनी ऑनलाईन पेमेंट करणे
दिनांक २८ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून
दिनांक २९ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत
६) सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास तृतीय ऑनलाईन सोडत व पेमेंटसाठी SMS पाठविणे
दिनांक २९ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता
७) तृतीय सोडतीतील भाविकांनी ऑनलाईन पेमेंट करणे
दिनांक २९ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून
दिनांक ३० जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत
८) माहे जुलै २०२६ मधील अंतिम सिंहासन पूजा बुकिंग यादी प्रसिद्ध करणे
दिनांक ३० जून २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता
सिंहासन पूजेसाठी इच्छुक भाविकांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी श्री तुळजाभवानीच्या महाराष्ट्रातील तसेच देशभरातील भाविक भक्तांनी या सूचनेची नोंद घ्यावी.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india