*जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा*
*विस्तार अधिकारी शिला मुदगडे यांची उपस्थिती*
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये 21 जून रोजी जागतिक योग दिन हा महिला सक्षमीकरणासाठी योग ही थीम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी योग शिक्षिका शीला मुदगडे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षकांकडून योगासन पूर्व हालचाली उभे राहून योगासने.बसून पाठीवर व पोटावरील विविध योगासने व प्राणायमाचे प्रात्यक्षिके करून मोलाचे योगदान दिले त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांना सामुदायिक सूर्यनमस्कार शिर्षासन ताडासन ओमकार प्राणायाम भ्रमरी करून घेण्यात आले विस्तार अधिकारी शिला मुदगडे यांनीप्रशालेचे योगाचे व प्राणायामाचे महत्व विषद केले. प्रशालेतील सोनाली मुसळे, विद्यानंद सुत्रावे सदानंद कुंभार प्रवीण शिंदे नागेश स्वामी भाग्यश्री पंडित वर्षाराणी पाटील पूजा गुंडीले उपस्थित होते . प्रशालेतील सेविका सुनिता राठोड व वनमाला वाले यांनी परिश्रम घेतले. प्रशालेतील विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने योग दिन साजरा करण्यासाठी उपस्थित होते भाग्यश्री पंडित यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार सोनाली मुसळे यांनी मानले.







