Best News Portal Development Company In India

श्री श्री रविशंकर विद्यामंदिरात योग दिवस उत्साहात साजरा…

श्री श्री रविशंकर विद्यामंदिरात योग दिवस उत्साहात साजरा…..

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

उमरगा शहरातील श्री श्री रविशंकर विद्यामंदिरात आतंरराष्ट्रीय योग दिवस. मोठ्या उत्साहात रविवार दि ‌ २१ रोजी साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांना विद्यार्थी आरोग्य चांगले कसे ठेवावे, सदृढ परिपक्व आरोग्यमय जीवन व विद्यार्थी बौद्धिक क्षमता वाढ इ. विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आर्ट ऑफ लिविंग प्रणित सर्व प्राणायम विद्यार्थी कॊर्सेस ची माहिती व फीट इंडिया मुव्हमेंट या संकल्पनेचा उद्देश २१ जून महत्व विषद करत मोठया उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला. इयत्ता छोटा गट तें दहावी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. दीपा मोरे, आर्ट ऑफ लिविंग समन्वयक मार्गदर्शक डॉ. उदय मोरे, आर्ट ऑफ लिविंग टीचर योग प्रशिक्षक ऍड. पुष्कर पोतदार, श्री श्री तत्व पंचकर्म डॉ रेणुका मोरे, श्री. अमृत मोरे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india