Best News Portal Development Company In India

जि. प. प्राथमिक शाळा वागदरी येथे विद्यार्थ्यासह उपस्थित मान्यवरांना दिली व्यसन मुक्तीची शपथ!

जि. प. प्राथमिक शाळा वागदरी येथे विद्यार्थ्यासह उपस्थित मान्यवरांना दिली व्यसन मुक्तीची शपथ!
—————————————————–
जळकोट (अरुण लोखंडे ) :
परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव तथा महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसन मुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी ता. तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यासह उपस्थित मान्यवरांना दिली व्यसन मुक्तीची शपत.
दि.२०जून २o२६ रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चे धाराशिव जिल्हा सचिव पत्रकार एस के गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी येथे विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास, अभिष्टचिंतन, मान्यवरांचा सत्कार व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे आणि खाऊचे वाटप अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
. या याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार दैनिक अंबरनाथ टाइम्स च्या वतीने दिला जाणारा “अंबरनाथ गौरव ” पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करून आपले उच्च शिक्षण पूर्ण करून निर्व्यसनी राहून आपला सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन करून त्याने उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना व्यसनमुक्तीची शपथ दिली याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मार्गदर्शक कैलास गवळी गुरुजी, आर.एस.गायकवाड, आदींचीही शुभेच्छा पर भाषणे झाली.
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच तथा ग्राम सदस्य ज्ञानेश्वर पाटील, अमोल पवार, भाजपा तालुका उपप्रमुख किशोर सुरवसे,माजी उपसरपंच दत्ता सुरवसे भाजपा मीडिया सेलचे तालुका उपप्रमुख किशोर धुमाळ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव वाघमारे आदी होते.
प्रारंभी स्त्री शिक्षणाच्या अध्यप्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाइं (आठवले ) चे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार अरुण लोखंडे यांनी केले तर सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते प्रबोध कांबळे यांनी केले याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील सुरेश लोंढे अरविंद लोखंडे अनिल वाघमारे दीपक वाघमारे चंद्रकांत वाघमारे तात्या वचने अंगणवाडीच्या पद्मिनी ताई पवार, रूपाली जाधव,कोमल झंडारे सहशिक्षिका एस.एस.मसे,सहशिक्षक एन.एन.काळे, डी.बी.अनपट,तानाजी लोहार विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india